सुपरस्टार थलापति विजयचा जलवा ! पहिल्याच दिवशी ‘लियो’ सिनेमा १०० कोटींच्या पुढे, रजनीकांतलाही टाकले मागे

Ahmednagarlive24 office
Published:
Leo movie

Leo movie : साउथचा सुपरस्टार थलापति विजयचा बहुप्रतीक्षित चित्रपट लियो (Leo) काल 19 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. लियो (Leo) ने पहिल्याच दिवशी मोठी कमाई करत मोठा विक्रम केला आहे.

थलापति विजयचा हा या वर्षातील सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट आहे. थलापति विजयच्या लियो (Leo) सिनेमाने पहिल्याच दिवशी जगभरात 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

Leo सिनेमाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन

एका रिपोर्टनुसार, लिओने पहिल्याच दिवशी देशातील बॉक्स ऑफिसवर सर्व भाषांमध्ये 63 कोटींचा व्यवसाय केला आहे. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर लिओचे एकूण कलेक्शन सुमारे 74 कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे. रिपोर्टनुसार, या चित्रपटाने जगभरात 130-140 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

पठाण चा विक्रम मोडला

मीडिया रिपोर्ट्सनुसार, थलापति विजयच्या लिओ ने पहिल्या दिवशी विक्रमी कमाई करत शाहरुख खानच्या पठाणला मागे टाकले आहे. रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानच्या पठाणने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 57 कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र, लिओने 63 कोटींचा व्यवसाय करत शाहरुख खानच्या पठाणला मागे टाकले आहे.

रजनीकांतलाही दिली टक्कर

केवळ शाहरुखच नाही तर थलापति विजयने रजनीकांतचा जेलर सिनेमालाही कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेलरने पहिल्या दिवशी 44 कोटी रुपये जमा केले होते. थलापति विजयचा लिओ हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. यामध्ये हिंदी, कन्नड, तमिळ, तेलुगू आणि कन्नड चा समावेश आहे. या चित्रपटात थलापति विजय सह संजय दत्त आणि तृषा कृष्णन मुख्य भूमिकेत आहेत. संजय दत्तने लिओमध्ये नेगेटिव भूमिका साकारली आहे.

दाक्षिणात्य सिनेमांची भुरळ

सध्या तरुण पिढीला दाक्षिणात्य सिनेमांची चांगलीच भुरळ पडली आहे. अलीकडलील काळात आलेले अनेक दाक्षिणात्य सिनेमे गाजले. पुष्पा, KGF हे दिखील याचेच उदाहरण आहे. तरुण पिढीला साऊथ स्टार आवडत आहेत. सिनेमाची स्टोरी, ऍक्शन व इतर गोष्टी सिनेमाकडे आकर्षित करत असतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe