पतीचा पगार 700 रुपये..जेवणाचेही हाल, आज 5 पेट्रोलपंपांची मालकीण आहे ‘ही’ महिला

Success Story : लग्नानंतर नवऱ्याचा पगार ७०० रुपये.. परिस्थिती अशी की, महिन्याच्या अखेरीस घरखर्च भागविणे अवघड… पण असे म्हणतात की जो हिंमत हारत नाही त्यांना देवही साथ देतो. आज या महिलेचे आज त्यांचे पाच पेट्रोल पंप आहेत.

एका महिलेची थक्क करणारी यशोगाथा आहे. ती आपण याठिकाणी पाहणार आहोत. बिहारमधील मुंगेर येथील रहिवासी सारिका सिंह असे या महिलेचे नाव आहे. त्या बलिया (मुंगेर) गावच्या प्रमुख आहेत. ही कथा एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी आहे.

लग्नानंतर सारिका स‍िंह या सोन्यासारखच भट्टीत तपाव्यात तशा तापल्या आणि आज चकाकत उठत शेकडो कुटुंबाचे ते आधार आहेत.

* कुटुंबाची आर्थिक स्थिती

बिहारमधील मुंगेर येथील रहिवासी सारिका सिंह आपल्या आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर दोनवेळा बलिया पंचायतीच्या प्रमुख बनल्या आहेत. १९९४ मध्ये सारिका सिंह चा विवाह मुंगेर येथील रहिवासी ललन सिंह याच्याशी झाला होता.

लग्नाच्या वेळी त्यांचे पती पाटण्यातील एका पेट्रोल पंपावर महिन्याला 700 रुपये पगारावर काम करत होते. त्यात कुटुंबाचा खर्च भागत नव्हता. बारावी पास असणारी सारिका आपल्या कुटुंबाच्या स्थितीबद्दल नेहमीच चिंतेत असायची. ती सांगते की,

वडिलांच्या घरात मुलींना शिकवण्याची पद्धत नव्हती. घरच्यांचा विरोध पत्करून तिने १९९३ मध्ये इंटरमीडिएटची परीक्षा उत्तीर्ण केली. पुढच्याच वर्षी त्यांचं लग्न झालं आणि त्यांना मुलगा झाला. कुटुंबात नवीन सदस्य आल्याने खर्च वाढला आणि ७०० रुपयांत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले.

* इथून नशीब बदललं

१९९७ मध्ये पाटण्यात केरोस‍िन डीलरसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. ती जागा महिलांसाठी राखीव होती. इथून आपलं नशीब बदलू शकतं असं सारिकला वाटलं आणि तिने अर्ज केला. त्यानंतर काही दिवसांनी ही निविदा रद्द करण्यात आली. १९९९ मध्ये पुन्हा या अर्जाची जाहिरात देण्यात आली.

२००३ मध्ये त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. त्यांना एजन्सी मिळाली आणि तेथूनच त्यांचे नशीब बदलले. त्यांच्या नावावर एजन्सी फायनल झाल्यानंतर पती-पत्नीने खूप मेहनत घेतली आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली झाली.

सारिका सिंह सांगतात की, २००७ मध्ये जेव्हा पेट्रोल पंपाची वेकेंसी निघाली तेव्हा त्यांनी त्यासाठी अर्ज करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पैशांअभावी त्यांनी दागिने गहाण ठेवले आणि अर्जासाठी चार लाख रुपये जमा केले. त्यांच्या भावानेही यावेळी मदत केली. सुदैवाने सारिका सिंग यांच्या नावाने पेट्रोल पंप देण्यात आला.

त्यानंतर तिच्या प्रामाणिकपणामुळे आणि चांगल्या वागणुकीमुळे आज तिचे पाच पेट्रोल पंप आहेत. त्यानंतर त्यांचे उत्पन्न वाढू लागले. २०१६ च्या पंचायत निवडणुकीत बलिया पंचायतीचे प्रमुखपद महिलेसाठी राखीव होते. यातही त्या बहुमताने विजयी झाल्या. अशा पद्धतीने त्यांनी आपल्या प्रयत्नाने आपले नशीब बदलून टाकले.