अहमदनगर : भीषण अपघातात कॉ.स्मिता पानसरेंचा मुलगा जागीच ठार

Published on -

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे ट्रॅक्टर-स्कार्पिओ-स्कुटी अशा तीन वाहनाचा भीषण अपघात झाला.

यामध्ये काॅ.स्मिता पानसरे यांचा मुलगा जागीच ठार झाला. नेवासा-शेवगाव राज्यमहामार्गावर व्यंकटेश ज्वेलर्स दुकानासमोर ही घटना घडली. अमित बन्सी सातपुते (वय ३३ वर्षे) हा जागीच ठार झाला.

त्याच्या डोक्यावरून टायर गेल्याने तो जागीच गतप्राण झाला. अमित हा ऍड. काॅ. बन्सी सातपुते व सामाजिक कार्यकर्त्या काॅ.स्मिता पानसरे यांचा मुलगा असून तो जागीच ठार झाला. ही घटना काल (दि २२) रात्री ८.३० वाजता घडल्याचं समजते.

अमित याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेवासा फाटा येथील ग्रामिण रुग्णालयात नेण्यात आलेला होता. अपघातानंतर स्कॉर्पिओ चालक तेथून पसार झाला होता. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe