Redmi Smart TV : सध्या सणासुदीचा हंगाम सुरु आहे. या दिवसात अनेकजण नवनवीन वस्तू खरेदी करतात. जर तुम्हाला या सणासुदीच्या दिवसात स्वस्तात Redmi स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
तुम्ही Amazon वरून 32 इंचाचा Redmi Smart TV अवघ्या 9999 रुपयांना खरेदी करता येईल, महत्त्वाचे म्हणजे या टीव्हीची किंमत 24,999 रुपये इतकी आहे. Amazon सेलमध्ये तुम्हाला टीव्हीवर 60 टक्के सवलत मिळेल. जाणून घ्या संपूर्ण ऑफर.
ग्राहकांना आता Redmi F-Series चा HD रेडी स्मार्ट टीव्ही मूळ किमतीच्या अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. प्रीमियम डिझाईनसह, ते रु. 10,000 पेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकतात. या टीव्हीमध्ये FireOS 7 असून याद्वारे वापरकर्ते त्यांच्या आवडीचे अॅप्स डाउनलोड करता येईल. टीव्ही 12000 पेक्षा जास्त स्मार्ट टीव्ही अॅप्सनाच सपोर्ट करत नाही तर यामध्ये स्क्रीन कास्टचा पर्याय आहे यामुळे मोबाईल स्क्रीनवरील सामग्री टीव्हीवर पाहता येऊ शकते.
स्वस्तात खरेदी करता येणार टीव्ही
किमतीचा विचार केला तर भारतीय बाजारात Redmi F-Series Smart Fire TV (L32R8-FVIN) ची लॉन्च किंमत 24,999 रुपये ठेवली होती, मात्र ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमुळे, त्यावर सवलत दिली जात आहे.
या फ्लॅट डिस्काउंटनंतर टीव्हीची किंमत 9,999 रुपयांवर असेल. तसेच बँक ऑफ बडोदा, HDFC बँक आणि Amazon Pay ICICI बँक कार्डद्वारे पेमेंटवर 10% अतिरिक्त सवलत मिळत आहे.
समजा तुम्ही OneCard क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केले तर 10% अतिरिक्त सवलत देण्यात येत आहे. बँक ऑफरमुळे टीव्हीची किंमत कमी होऊ शकते. जुन्या मॉडेलची देवाणघेवाण करताना खरेदी केला तर 2000 रुपयांपर्यंत अतिरिक्त एक्सचेंज सवलत मिळेल. टीव्हीचे मूल्य जुन्या डिव्हाइसच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असते. टीव्हीसोबत मोफत इन्स्टॉलेशन मिळेल.
खासियत
Redmi स्मार्ट टीव्हीत 60Hz रिफ्रेश रेटसह 32-इंच आकाराचा डिस्प्ले असून 720p रिझोल्यूशन ऑफर करतो. फायरओएस 7 सह, हे प्राइम व्हिडिओ, नेटफ्लिक्स आणि यूट्यूबसह 12 हजारांहून जास्त अॅप्सचे समर्थन करते. यामध्ये अलेक्सा सपोर्टसह व्हॉईस रिमोट आणि प्रीमियम मेटल बेझल-लेस डिझाइन मिळेल. एअरप्ले आणि मिराकास्टसह स्क्रीन मिरर करण्याचा पर्याय आहे. तसेच शक्तिशाली ऑडिओसाठी, यात डॉल्बी ऑडिओ समर्थनासह 20W स्पीकर मिळतील.