Toxic Snake: हे आहेत जगातील सर्वात जहाल विषारी साप! ‘या’ जातीच्या सापाने विष फेकल्याने देखील होतो मृत्यू

Ajay Patil
Published:
toxic snake species

Toxic Snake:- सापाबद्दल जगभरातील लोकांमध्ये बऱ्याच बाबतीत संभ्रम दिसून येतो तसेच अंधश्रद्धा आणि सापाच्या संबंधित अनेक चुकीच्या गोष्टींवर देखील विश्वास ठेवला जातो. साधारणपणे सगळे सापांच्या जाती विषारी नसून काही बोटांवर मोजणे इतक्याच जाती या विषारी आहेत. जगाच्या पाठीवर सापांच्या 2500 पेक्षा अधिक प्रजाती दिसून येतात परंतु त्यातील फक्त पाचशे प्रजाती विषारी आहेत. याचा अनुषंगाने आपण या लेखांमध्ये जगातील काही विषारी सापांच्या जातींविषयी माहिती घेणार आहोत.

 सापाच्या या प्रजाती आहेत सर्वात जास्त विषारी

1- सागरी साप( समुद्री साप)- सागरी किंवा समुद्री साप हा दक्षिण पूर्व आशिया आणि उत्तर ऑस्ट्रेलिया मध्ये आढळून येतो. हा जगातील सर्वात विषारी साप असून या सापाच्या विषाचे फक्त काही मिलीग्राम थेंब एक हजार लोकांचा जीव घेऊ शकतो. प्रामुख्याने समुद्रात आढळणारा हा सापासून मासेमारी करताना बहुतेक मच्छीमार या सापाच्या चाव्याला बळी पडतात.

Sea snake - Wikipedia

2- ईस्टर्न ब्राऊन स्नेक सापाची ही जात अतिशय विषारी असून ती ऑस्ट्रेलिया या देशात आढळून येते. विशेष म्हणजे या सापाच्या विषाचा 14000 वा भाग माणसाला मारण्यासाठी पुरेसा ठरतो. ऑस्ट्रेलियातील मानवी वस्तीजवळ अधिक प्रमाणात या प्रजातीचा साप आढळून येतो. विशेष म्हणजे या सापाच्या प्रजातीचे लहान पिल्लू देखील माणसाला मारू शकते. या सापाची हालचाल खूप वेगवान असते व त्याला धोका जाणवला की तो पाठलाग करतो.

Brown snake | Description & Facts | Britannica

3- रॅटल स्नेक उत्तर अमेरिकेमध्ये आढळणारा हा सर्वात विषारी साप असून या सापाच्या शेपटीच्या शेवटी असलेल्या कड्यांमुळे हा खास करून ओळखला जातो. जेव्हा हा साप शेपूट हलवतो तेव्हा याच्या शेपटीकडील कडे लहान मुलांच्या रॅटल सारखे आवाज करतात म्हणून त्याला रॅटल स्नेक नाव पडले आहे. हा थोडा रागीट स्वभावाचा साप असून या सापाच्या पिल्लांमध्ये देखील सर्वाधिक विष भरलेले असते.

Rattlesnake

4- डेथ ऑर्डर या जातीचा साप ऑस्ट्रेलिया आणि न्यू गिनी मध्ये आढळून येतो. या प्रजातीचा साप हा इतर प्रजातींच्या सापाचे देखील शिकार करतात व त्याचे वीष न्यूटॉक्सिन आहे. म्हणजेच एकाच वेळी एखाद्याच्या शरीरामध्ये 100 मिलिग्रॅम पर्यंत विष सोडू शकते. या प्रजातीच्या सापाच्या विषाचा शरीरावर हळूहळू परिणाम होतो.

Common death adder - Wikipedia

5- ब्लॅक मांबा आफ्रिकेमध्ये आढळणारी सापाची ही प्रजात पृथ्वीवरील सर्वात वेगाने फिरणारी सापांची प्रजात आहे. भक्षाचा पाठलाग करताना ताशी 20 किलोमीटर इतके वेगाने तो धावू शकतो. जेव्हा त्याला भक्ष सापडते तेव्हा एकाच वेळी दहा ते बारा वेळा चावा घेतो आणि शंभर मिलिग्रॅम पर्यंत विष मानवी शरीरात सोडतो. ब्लॅक मांबा प्रजातीच्या सापाचे केवळ एक मिलीग्राम विष माणसाला मारण्यासाठी पुरेसे आहे.

Black Mamba, Black, snake, Mamba, animal, HD wallpaper | Peakpx

6- फिलिपिन कोब्रा कोबरा सापांच्या बहुतेक प्रजाती विषारी असतात परंतु फिलिपिन कोब्रा मध्ये खूप विष असते. या प्रजातीच्या सापाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा  चावण्याऐवजी दुरूनच विष फेकतो.तीन मीटर अंतरावरून देखील तो शिकारीवर विष फेकू शकतो व एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर विष तो फेकतो. या सापाचे विष न्युरोटॉक्सिक असल्यामुळे श्वासोश्वास आणि हृदयावर थेट परिणाम करते.

Philippine cobra - Wikipedia

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe