अहमदनगर ब्रेकिंग : महिलेसोबतचे अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्या ‘त्या’ प्राचार्यावर गुन्हा दाखल करा

Published on -

Ahmednagar News : नेवासा तालुक्यातील महाविद्यालयाच्या एका प्राचाऱ्याने अश्लील फोटो व्हायरल केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

याप्रकरणी समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार देण्यात आली आहे.

येत्या पंधरा दिवसात कारवाईने न झाल्यास संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांच्या निवासस्थानासमोर विद्यार्थी व पालकांसह ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

प्राचार्याने महिलेसोबतचे अश्लील चाळ्यांचे फोटो विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर यांचा सहभाग असलेल्या सोशल मीडियाच्या ग्रुपवर व्हायरल केले.

जवळजवळ २८ फोटो टाकण्यात आले. सदर फोटो व्हायरल करणाऱ्या प्राचाऱ्यावर कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही.

पालकांमध्ये तीव्र असंतोष व मुला-मुलींच्या भवितव्याच्या दृष्टीने असुरक्षितता निर्माण झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News