पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमास मंत्री आठवले यांना बोलवा रिपाईं कार्यकर्ते जगताप यांची मागणी

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

 

Ahmednagar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत शिर्डी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना बोलविण्यात यावे, अशी मागणी रिपाईंचे कार्यकर्ते व संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आत्माराम जगताप यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात जगताप यांनी म्हटले की, शिर्डी लोकसभा मतदार संघातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी निवडणूक लढविली होती. भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा समावेश आहे.

मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी (दि. २६) ऑक्टोबर रोजी शिर्डीत येत आहेत. मात्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कुठेही विश्वासात घेतले जात नाही. रामदास आठवले हे पुन्हा शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत, मात्र ना. आठवले यांना व त्यांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मतदार संघात डावलले जात आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना पंतप्रधानांच्या कार्यक्रमात सहभागी करून घेतले नाही. तर रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते सदर कार्यक्रमावर बहिष्कार टाकतील, असे रिपाईंचे कार्यकर्ते आत्माराम जगताप यांनी म्हटले आहे.