Shukra Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह विशिष्ट वेळेच्या अंतराने आपली राशी बदलतो, जेव्हा ग्रह आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा इतर राशींवर देखील परिणाम दिसून येतो. अशातच, या काळात 2 ग्रह एकत्र येण्याने ग्रहयोग आणि राजयोग देखील निर्माण होणार आहेत, ज्याचा मानवी जीवनावर नकारात्मक आणि सकारात्मक असा परिणाम दिसून येणार आहे.
सुख, ऐश्वर्य आणि संपत्तीचा कारक शुक्र 3 नोव्हेंबरला सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर 12 नोव्हेंबरला शुक्र हस्त आणि 24 नोव्हेंबरला चित्रा नक्षत्रात प्रवेश करेल. शुक्राच्या या राशी बदलामुळे नीचभंग राजयोग तयार होईल, जो अनेक राशींसाठी भाग्यवान ठरणार आहे.
‘या’ राशींवर होईल परिणाम
मकर
शुक्राचे कन्या राशीत होणारे संक्रमण या राशीच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी ठरणार नाही. या काळात उत्पन्न वाढेल आणि नशीब तुमच्या बाजूने असेल. धार्मिक प्रवासालाही जाता येईल. अनेक दिवसांपासून रखडलेल्या कामांना गती मिळेल. नोकरी-व्यवसायाच्या संदर्भात प्रवासही करू शकता. स्पर्धात्मक विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम असेल. तसेच नीचभंग राजयोग देखील फायदेशीर ठरू शकतो. सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील. व्यवसाय परदेशाशी संबंधित असल्यास नवीन प्रस्ताव येऊ शकतात. तसेच, स्पर्धात्मक विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ ठरू मानला जात आहे.
सिंह
या काळात आर्थिक स्थिती मजबूत असेल आणि अनपेक्षित पैसे मिळू शकतील, यावेळी नशीब तुमच्या पाठीशी राहील, यशाची नवीन दारे उघडू शकतात. व्यक्तिमत्व सुधारेल. वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी येण्याची शुभ शक्यता आहे. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंध खूप सौहार्दपूर्ण असतील.
धनु
शुक्राचे संक्रमण आणि नीचभंग राजयोगाची निर्मिती धनु राशीसाठी उत्तम ठरेल. करिअर आणि बिझनेसच्या दृष्टीने वेळ शुभ राहील. तुम्हाला नवीन डील मिळू शकते, तुम्हाला पैसे मिळू शकतात. समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल. नोकरदारांसाठी काळ चांगला राहील. बढती किंवा पगार वाढ यासारखे शुभ परिणाम मिळू शकतात. नोकरीत यश मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना मोठी आणि चांगली ऑर्डर मिळू शकते.