Ahmednagar News : नेवासा तालुक्यातील रामडोह येथील शेतकऱ्याचा ४० हजार रुपये किंमतीचा ६ क्विंटल कापूस चोरीला गेल्याची घटना (दि. २४) रोजी रात्री १० वाजेचे सुमारास घडली.
याबाबद राजाराम हरीभाऊ जाधव ( वय ४७, रा. रामडोह ता. नेवासा) यांनी नेवासा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, माझे घरा जवळील कांदा चाळीचे शेडमध्ये मी कापूस ठेवलेला असून तसेच माझे शेड जवळील पिकअप क्र. (एमएच १७ वी बाय ३८७४) मध्ये मी कापूस विक्रीसाठी ठेवलेला होता.
(दि.२४) रोजी रात्री १० वाजेचे सुमारास मी माझे घरा जवळील कांदा चाळीचे शेडकडे गेलो असता मी कांदा चाळी मध्ये ठेवलेला कापुस व पिकअप मध्ये ठेवलेला कापूस सुस्थीतीत होता.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी (दि. २५) रोजी सकाळी ८ वाजेचे सुमारास मी माझे कांदा चाळी जवळ माझे पिकअप मध्ये असलेल कापूस खाली करण्यासाठी गेलो असता, मला माझे पिकअप मध्ये ठेवलेला ३५८ किलो कापूस गाडीमध्ये दिसला नाही.
त्यावेळी मी माझे कांदा चाळीमध्ये ठेवलेला कापूस पाहिला असता कांदा चाळीमधील अंदाजे २ क्विंटल कापूस मला कमी झालेला दिसला. त्यावेळी मी माझे कांदाचाळी मधील व पिकअप कापसाचा शोध घेतला. परंतु तो मिळून न आल्याने माझी खात्री झालो की माझा कापूस कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे.
यात ४० हजार रुपये किंमतीचा अंदाजे ६ क्विंटल कापूस पिकअप मधील भोत व गोण्यामध्ये भरलेला व कांदा चाळी मध्ये सुट्टा टाकलेला कापूस चोरीस गेला आहे.
त्यामुळे रामडोह गावात खळवाडी येथील घराचे जवळ असलेल्या कांदा चाळीच शेडमधुन व शेडजवळ उभे केलेल्या पिकअप मधुन अंदाजे ६ क्विंटल कापूस माझे संमती शिवाय अज्ञात चोरट्याने स्वताच फायद्याकरीता लबाडीचे इरादयाने चोरून नेला आहे.
म्हणून माझी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद आहे. या फिर्यादिवरुन नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.