Ahmednagar News : मराठा आरक्षणासंदर्भात समाज आक्रमक, आ. मोनिका राजळेंच्या गाडीला घेराव

Ahmednagar News

Ahmednagar News : आरक्षणासंदर्भात मराठा समाज आक्रमक झाला आहे. अनेक गावांत पुढाऱ्यांना बंदी घातली आहे. आज सकाळी पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे सकल मराठा समाजाने आ. मोनिका राजळेंच्या गाडीला घेराव घालत निषेध व्यक्त केला. यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता.

खरवंडी कासार येथे आमदार मोनिका राजळे दशक्रिया विधिनिमित्त आल्या होता. पुढाऱ्यांना गावबंदी असतानाही त्या गावात आल्याने लोक आक्रमक झाले. अंबादास जगताप यांनी राजळेंशी चर्चा केली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटलांना माझा पाठींबा आहे असे मत व्यक्त केले.

दरम्यान यावेळी आलेला समजा आक्रमक झाला होता. परंतु गावात दुःखद घटना घडलेली होती. त्यामुळे नागरिकांनी काळे झेंडे न दाखवता शांततेत संभाषण केले. निषेध व्यक्त करू नये यासाठी काही राजळे समर्थक मध्यस्थी करत होते.

जगताप यांनी आक्रमक शब्दात त्या कार्यकर्त्यांचा समाचार घेतला. गावात दुःखद प्रसंग घडला आहे म्हणून शांत आहे. आरक्षण मिळेपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश बंदी म्हणजे बंदीच आहे. गावात येताना परिणामाचा विचार करूनच खरवंडी कासार मध्ये यावे. आता आमच्या भावनेचा अंत संपला आहे असे मत जगताप यांची यावेळी व्यक्त केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe