Sukanya Samriddhi Yojana : मुलींच्या उज्वल भविष्यासाठी ‘या’ सरकारी योजनेत करा गुंतवणूक, 26 लाखापर्यंत मिळेल फायदा !

Content Team
Published:
Sukanya Samriddhi Yojana

Sukanya Samriddhi Yojana : केंद्र आणि राज्य सरकारकडून केंद्र आणि राज्य सरकारकडून वेळोवेळी देशातील महिला आणि मुलींसाठी अनेक योजना राबवल्या जातात. या योजनांअंतर्गत मुली आणि महिला त्यांचे आयुष्य सुरक्षित करू शकतात. सरकारकडून देशातील महिलांनासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. यातीलच एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. या योजनेअंतर्गत मुलींचे भविष्य सुरक्षित केले जाते. काय आहे ही योजना? आणि कशी काम करते? चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

या योजनांच्या माध्यमातून सरकार महिलांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न करत आहे. मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने ही योजना सुरू केली होते. या योजनेद्वारे, आपण हळूहळू लहान रक्कम जमा करून एक मोठा निधी तयार करू शकतो. सध्या सुकन्या समृद्धी योजनेवर वार्षिक ८ टक्के व्याज मिळत आहे.

SSY मध्ये गुंतवणूक करताना कोणताही धोका नाही. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलींचे भविष्य सुधारू शकता. यामध्ये, मुलगी 21 वर्षांची झाल्यावर मॅच्युरिटी रक्कम मिळते. लहान बचत योजनांमध्ये ही सर्वाधिक व्याज देणारी योजना आहे. अल्पबचत योजनेच्या व्याजदरांचे प्रत्येक तिमाहीत पुनरावलोकन केले जाते.

5000 रुपयांच्या मासिक गुंतवणुकीवर किती मिळेल परतावा?

सुकन्या समृद्धी योजनेत दरमहा 5000 रुपये जमा केल्यास, तुम्हाला एका वर्षात 60,000 रुपये जमा करावे लागतील. अशा प्रकारे, तुम्ही १५ वर्षांत एकूण ९,००,००० गुंतवणूक कराल. 15 ते 21 वर्षांच्या दरम्यान पैसे जमा करायचे नाहीत. तुम्हाला तुमच्या रकमेवर ८ टक्के दराने व्याज मिळेल. आता एकूण 9 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 17,93,814 व्याज मिळेल. हे एकूण गुंतवणुकीच्या जवळपास दुप्पट असेल. अशा परिस्थितीत, तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण 26,93,814 म्हणजेच जवळपास 27 लाख मिळतील. तुम्ही दरवर्षी किमान 250 रुपये गुंतवून ही योजना सुरू करू शकता. तुम्ही वार्षिक कमाल 1,50,000 रुपये गुंतवू शकता.

कर लाभ

सुकन्या समृद्धी योजना ही करमुक्त योजना आहे. यावर तीन वेगवेगळ्या स्तरांवर कर सवलत उपलब्ध आहे, म्हणजे EEE. प्रथम, आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक गुंतवणुकीवर सूट. दुसरे म्हणजे, त्यातून मिळणाऱ्या रिटर्नवर कोणताही कर नाही. तिसरे, मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम करमुक्त असते.

वयाच्या 10 वर्षापूर्वी खाते उघडा

सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत मुलींचे वय 10 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी खाते उघडता येते. या योजनेत कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींचे खाते उघडता येईल. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नासाठी आणि उच्च शिक्षणासाठी निधी तयार करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe