Samsung Galaxy F54 5G : बंपर ऑफरचा लाभ घेण्याची शेवटची संधी! 108MP कॅमेरा असणारा 5G फोन खरेदी करा तुमच्या बजेटमध्ये

Ahmednagarlive24 office
Published:
Samsung Galaxy F54 5G

Samsung Galaxy F54 5G : जर तुम्ही सॅमसंगचा नवीन 5G फोन तुमच्या बजेटमध्ये खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता फ्लिपकार्ट ऑफरमधून कंपनीचा एक शक्तिशाली स्मार्टफोन खूप स्वस्तात खरेदी करू शकता.

तुम्हाला आता बँक ऑफरद्वारे Samsung Galaxy F54 5G फोनची किंमत 750 रुपयांनी कमी करता येईल. तसेच एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला फोनवर 21,950 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सवलत मिळेल. परंतु हे लक्षात ठेवा की बदल्यात मिळणारी सवलत तुमच्या जुन्या फोनची स्थिती, ब्रँड आणि कंपनीच्या धोरणावर अवलंबून असणार आहे.

जाणून घ्या Samsung Galaxy F54 5G ची खासियत

कंपनीच्या या जबरदस्त फोनमध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी सुपर एमोलेड डिस्प्ले पाहायला मिळेल. हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटसह येत असून डिस्प्ले संरक्षणासाठी फोनमध्ये तुम्हाला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 मिळेल. स्टोरेजचा विचार केला तर हा फोन 8 GB रॅम आणि 256 GB अंतर्गत स्टोरेज पर्यायामध्ये येतो. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने तुम्ही फोनची मेमरी 1 टीबीपर्यंत वाढवता येईल. तसेच प्रोसेसर म्हणून या फोनमध्ये Exynos 1380 चिपसेट दिला आहे.

कंपनीचा हा फोन उत्तम कॅमेरा सेटअप सह येत असून त्याच्या मागील पॅनलवर एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. यात 108-मेगापिक्सेल प्राथमिक लेन्ससह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स दिली आहे. इतकेच नाही तर कंपनी सेल्फीसाठी फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत असून साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह या फोनमध्ये तुम्हाला 6000mAh बॅटरी मिळू शकते.

कंपनीच्या या फोनमध्ये देण्यात आलेली ही बॅटरी 25 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करत असून यात जोपर्यंत OS चा संबंध आहे, फोन Android 13 वर आधारित OneUI 5.1 वर काम करेल. त्याशिवाय कनेक्टिव्हिटीसाठी, या फोनमध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट, वाय-फाय आणि ब्लूटूथसह सर्व मानक पर्याय दिले आहेत. कंपनीचा हा फोन उल्का ब्लू आणि स्टारडस्ट सिल्व्हर अशा दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe