iQoo 12 Series : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर जरा थांबा. आता बाजारात iQoo 12 सीरिज लाँच होणार आहे. कंपनी अनेक दिवसांपासून या सीरीजवर काम करत होती. तुमच्यासाठी हा उत्तम फोन असेल.
भारतीय बाजारात नवीन iQoo स्मार्टफोनच्या आगमनाची पुष्टी Vivo सब-ब्रँडने Weibo द्वारे करण्यात आली आहे. गेमिंग-केंद्रित iQoo 12 आणि iQoo 12 Pro Qualcomm च्या नवीनतम Snapdragon 8 Gen 3 SoC द्वारे समर्थित असेल.
Qualcomm चा नवीन-gen SoC IQOO 12 मध्ये उपलब्ध असणार आहे, ज्यासह तो भारतातील पहिला फोन असू शकतो. महत्त्वाचे म्हणजे iQoo 12 सीरिजमध्ये Android 14 ऑपरेटिंग सिस्टम उपलब्ध असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
महत्त्वाचे म्हणजे iQoo 12 5G च्या भारतात आगमनाची माहिती iQoo इंडियाचे सीईओ निपुण मेरी यांनी X वर एका पोस्टमध्ये दिली असून कंपनीच्या CEO ने पुष्टी केली की स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 चिपसेट सह येणारा हा भारतीय बाजारातील पहिला फोन असणार आहे.
या दिवशी लॉन्च होणार iQoo 12 सीरिज
लॉन्चबद्दल बोलायचे झाले तर IQOO 12 आणि IQOO 12 Pro 7 नोव्हेंबरला चीनमध्ये लॉन्च होईल. यासंदर्भात एक टीझर पोस्टही Weibo वर शेअर केला आहे. यानुसार, IQOO 12 सीरिज Qualcomm च्या नवीनतम Snapdragon 8 Gen 3 SoC वर चालेल. नवीन SOS सह येणारा हा पहिला गेमिंग फोन आहे, असे सांगितले जात आहे.
जाणून घ्या खासियत
IQOO 12 सीरिज 144Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि ट्रिपल रिअर कॅमेराला सपोर्ट करणार आहे. Snapdragon 8 Gen 3 SoC स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 SoC च्या उत्तराधिकारीद्वारे समर्थित असणार आहे. हा फोन जनरेटिव्ह एआयवर फोकस करणारा पहिला मोबाइल प्लॅटफॉर्म असे, असा कंपनीचा दावा आहे. यात Wi-Fi 7 आणि ड्युअल ब्लूटूथचा सपोर्ट असणार आहे. प्राइम कोर फोनच्या CPU मध्ये उपलब्ध असू शकतो, ज्याची कमाल क्लॉक स्पीड 3.3GHz असेल.
स्पेसिफिकेशन (अपेक्षित)
स्टोरेजचा विचार केला तर मागील लीकनुसार, IQOO 12 आणि IQOO 12 Pro फोनमध्ये दोन स्टोरेज पर्यायांसह ऑफर केले जातील, जे 24GB रॅम आणि 1TB स्टोरेजला समर्थन देऊ शकतात. iQoo 12 सीरिजमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यात मुख्य कॅमेरा OIS सह 50-मेगापिक्सेल असेल. दुसरा कॅमेरा 64-मेगापिक्सेल आणि 50-मेगापिक्सलचा Samsung ISOCELL JN1 सेंसर अल्ट्रा-वाइड-एंगलसह येईल.
iQOO 12 मध्ये 120W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,880mAh ड्युअल-सेल बॅटरी पॅक मिळेल. प्रो मॉडेलमध्ये 120W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगसाठी समर्थनासह मोठी 4,980mAh बॅटरी असणार आहे.