Kawasaki ला टक्कर द्यायला येतेय BMW M 1000 XR , जाणून घ्या किंमत व फीचर्स

Ahmednagarlive24 office
Published:

BMW M 1000 XR : BMW MotorCorp ने त्यांची नवीन आणि सर्वात शक्तिशाली क्रॉसओवर स्पोर्ट बाईक M 1000 XR चे अनावरण केले आहे. ती भारतात लवकरच लॉन्च करण्याची योजना आहे.

BMW च्या विद्यमान S 1000 XR वर आधारित ही बाईक असणार आहे. पण बीएमडब्ल्यूने एम सेगमेंटमध्ये त्याचा समावेश केला आहे. यामध्ये तुम्हाला पॉवरफुल इंजिन, कार्बन फायबर आणि अनेक फीचर्स मिळणार आहेत. चला जाणून घेऊयात –

New BMW M 1000 XR डिझाईन:-  BMW M 1000 XR कार्बन फायबर आणि आधुनिक बॉडीवर्कने सुसज्ज आहे. त्याच्या प्रोफाईलला सुपर स्पोर्टी लूक देण्यात आला आहे.

यात स्प्लिट एलईडी हेडलाइट्स, वरती एक स्मोक्ड वाइज़र व बार-एंड मिररसह रुंद सिंगल पीस हँडलबार बसविण्यात आला आहे. लाइट व्हाईट आणि ब्लॅक स्टॉर्म मेटॅलिक हे दोन कलर ऑप्शन यात असतील.

BMW M 1000 XR फिचर्स :- यामध्ये AM कार्बन व्हील, एम रायडर फूटरेस्ट, एम रिअर फूटरेस्ट आणि एम जीपीएस-लॅपट्रिगर अॅक्टिव्हेशन कोड आदी फिचर्स यात देण्यात आली आहेत. तसेच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, व्हॉईस असिस्ट नेव्हिगेशन सिस्टम, हीटेड ग्रिप आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम यासारख्या सुविधा मिळतात.

BMW M 1000 XR इंजिन :- BMW M 1000 XR मध्ये 999 सीसी इन-लाइन फॉर सिलिंडर लिक्विड कूल्ड मोटर आहे. ही कार 201 बीएचपीपॉवर आणि 112 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. यात 6 – स्पीड गियरबॉक्स देण्यात आला आहे.

यामध्ये तुम्हाला टू-डायरेक्शनल क्विकशिफ्टर टेक्नॉलॉजीचा फायदा देण्यात आला आहे. सेफ्टी फीचर्समध्ये पिट लेन लिमिटर, लाँच कंट्रोल, डायनॅमिक ट्रॅक्शन कंट्रोल, व्हीली कंट्रोल, एबीएस, स्लाइड कंट्रोल, डायनॅमिक ब्रेक कंट्रोल, शिफ्ट असिस्टंट यांचा समावेश आहे. याच्या मदतीने तुम्हाला रीडिंग मोड (रेन, रोड, डायनॅमिक, रेस आणि रेस प्रो 1-3) सारखे मोड मिळतात.

BMW M 1000 XR सस्पेन्शन व ब्रेक्स :- BMW M 1000 XR च्या सस्पेंशनमध्ये फ्रंटमध्ये 45 एमएम यूएसडी फ्रंट फोर्क आणि मागच्या बाजूला मोनोशॉक देण्यात आला आहे. ब्रेकच्या बाबतीत पाहिले तर फ्रंट मध्ये ड्युअल 320mm डिस्क ब्रेक आणि मागच्या बाजूला 265mm सिंगल डिस्क ब्रेक जोडण्यात आले आहेत.

BMW M 1000 XR Launch Date and Price :-  बीएमडब्ल्यू एम 1000 एक्सआर लवकरच भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. कारण बीएमडब्ल्यूने याआधीच आपल्या सोशल मीडिया हँडलवर तसेच आपल्या अधिकृत वेबसाइटवर लाँच केले आहे.

2023 च्या अखेरीस लाँच होण्याची शक्यता आहे. बीएमडब्ल्यू एम 1000 एक्सआरची किंमत भारतीय बाजारात बीएमडब्ल्यू एम 1000 आर पेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. याची एक्स शोरूम किंमत 24.96 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe