Upcoming Hyundai Cars In 2024 : भारतीय बाजारात चारचाकी वाहनांची मागणी प्रचंड वाढली आहे. तरुणांमध्ये तर कार वापरण्याची क्रेझ चांगलीच वाढली आहे. यात अनेक कंपन्या अग्रेसर असल्या ह्युंदाईच्या गाड्या वापरण्याची क्रेझ काही औरच. आता ही दक्षिण कोरियाची ऑटोमोबाइल कंपनी ह्युंदाई भारतीय बाजारपेठेसाठी अनेक प्रोडक्ट्स लाँच करण्याची योजना आखत आहे.
यापैकी काहींमध्ये सध्या असणारे मॉडेल्स जसे की, अल्काझर, क्रेटा आणि कोना इलेक्ट्रिक यांच्या अपग्रेडेड व्हर्जनचा समावेश आहे. हे रिफ्रेश व्हर्जन 2024 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. याशिवाय ह्युंदाई 2025 मध्ये न्यू जनरेशन व्हेन्यू (सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही) लाँच करू शकते.
कंपनी क्रेटा इलेक्ट्रिक आणि एक्सेटर इलेक्ट्रिक ही दोन इलेक्ट्रिक वाहने लाँच करण्याची योजना आखत आहे. तथापि, एक्सेटर इलेक्ट्रिकची स्पेसिफिक लॉन्च टाइमलाइन अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पुढील वर्षासाठी कंपनीच्या दोन सर्वात मोठ्या लाँचिंगबद्दल बोलायचे झाले तर यात ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट आणि ह्युंदाई व्हर्ना एन लाइन मॉडेलचा समावेश असू शकतो.
हुंडई क्रेटा फेसलिफ्ट :- Creta ही Hyundai ची सर्वात लोकप्रिय कार आहे. 2024 मध्ये येणारी फेसलिफ्टेड वर्जन नवीन डिझाइन, अपडेटेड फीचर्स आणि अनेक इंजिन पर्यायांसह येईल. हे जानेवारी 2024 मध्ये लॉन्च केले जाऊ शकते. त्याची रचना Palisade SUV सारखी असण्याची शक्यता आहे.
Advanced Driver Assistance Systems (ADAS) तंत्रज्ञान यामध्ये समाविष्ठ असण्याची शक्यता आहे. यामध्ये, Verna सारखेच 1.5L टर्बो पेट्रोल इंजिन (160bhp), 1.5L नैचुरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन (115bhp) आणि 1.5L डिझेल युनिट (115bhp) आढळू शकते.
Hyundai Verna N लाइन :- Verna ही Hyundai ची आणखी एक लोकप्रिय कार आहे. 2024 मध्ये येणारी Verna N Line ही त्याच्या रेगुलर मॉडेलचे स्पोर्टी वर्जन असेल, ज्याला अधिक पावरफुल इंजिन, स्पोर्टी सस्पेंशन आणि आक्रमक डिझाइन मिळेल.
चाचणी दरम्यान त्याचा प्रोटोटाइप आधीच पाहिला गेला आहे. हे रेगुलर Vernaच्या टॉप-एंड ट्रिमवर आधारित असेल. यात 1.5 लीटर पेट्रोल इंजिन असेल, जे 160bhp आणि 253Nm आउटपुट देते.