अहमदनगर जिल्हा हादरला ! तरुणाची निर्घृण हत्या, पाच जणांना ठोकल्या बेड्या

Ahmednagar News

Ahmednagar News : मागील वादाच्या कारणावरून कोयते व तलवारीने वार करत तरुणाची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना नेवासा तालुक्यातील गळनिंब शिवारात शुक्रवारी (दि. २७) रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली.

प्रवीण सुधारकर डहाळे (वय २४, रा. गळनिंब, ता. नेवासा) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखेला शनिवारी यश आले.

खुनाच्या गुन्ह्यात अटक केलेले आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. अशोक ऊर्फ खंडू किसन सतरकर (वय ४२, रा. गेवराई, ता. नेवासा), ईश्वर नामदेव पठारे (वय ३०, रा. वरखेड, ता. नेवासा), शेखर अशोक सतरकर (वय २३, रा. गेवराई, ता. नेवासा), अरुण ऊर्फ ज्ञानेश्वर दत्तात्रय गणगे (वय २८, रा. सुरेगाव, ता. नेवासा),

बंडू भीमराव साळवे (वय ३२, रा. बाबुर्डी बेंद, ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत प्रमोद संभाजी कापसे (रा. सुरेगाव, ता. नेवासा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेवासा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला.

मयत प्रवीण डहाळे हा प्रमोद कापसे याचा मित्र होता. त्याचे १५ दिवसांपूर्वी आरोपींशी फोनवरून वाद झाले होते. यातून शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास प्रवीण डहाळे यास रस्त्यात अडवून कोयते व तलवारीसारख्या धारदार शस्त्राने वार करत त्याचा निर्घृण खून करण्यात आला.

त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. प्रवीण रक्ताच्या थोरोळ्यात पडला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला.

तांत्रिक विश्लेषणात सदरचा गुन्हा अशोक सतरकर व ईश्वर पठारे यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी केल्याचे समोर आले. हे दोघे नेवासा तालुक्यातील वरखेड येथे लपून बसल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने वरखेड येथे सापळा रचला.

त्यात वरील दोघे आरोपी अडकले. त्यांच्याकडून इतर तिघांची नावे निषन्न झाले. त्यांनाही अटक केली आहे. ही कारवाई पोलिस निरिक्षक आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील तुषार धाकराव, भाऊसाहेब काळे, राजेंद्र वाघ, देवेंद्र शेलार, रवींद्र कर्डिले, संदीप दरंदले यांच्या पथकाने केली.

२४ तासांत आरोपी गजाआड

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवित चोवीस तासांत आरोपींना शोधून काढले. दोघांना वरखेड येथून, तिघांना तीसगाव येथून अटक केली असून, आरोपींना नेवासा पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe