Xiaomi 12 Pro 5G : सध्या स्मार्टफोनच्या किमती खूप वाढल्या आहेत, त्यामुळे प्रत्येकाला फोन पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन खरेदी करावे लागत आहेत. जर तुम्ही स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर आहे.
यामुळे तुम्ही हजारोंची बचत करू शकता. 18 मिनिटांत चार्ज होणारा 5G Xiaomi स्मार्टफोन आता तुम्ही अवघ्या 10849 रुपयांना खरेदी करू शकता. फोनची मूळ किंमत 85000 रुपये इतकी आहे. जाणून घ्या संपूर्ण ऑफर.

Xiaomi 12 Pro 5G या फोनच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटवर सवलत मिळत आहे. 84,999 रुपयांच्या मूळ किमतीसह 12GB रॅम व्हेरिएंट 35,000 रुपयांच्या सवलतीनंतर 49,999 रुपयांना खरेदी करता येईल. फ्लिपकार्ट फोनवर 39,150 रुपयांपर्यंतचा जबरदस्त एक्सचेंज बोनस मिळत आहे.
समजा तुमच्याकडे एक्सचेंज करण्यासाठी जुना फोन असल्यास आणि तुम्ही जुन्या फोनवर संपूर्ण एक्सचेंज बोनस मिळवण्यात व्यवस्थापित करत असल्यास तर फोनची प्रभावी किंमत फक्त 10,849 रुपये (₹49,999 – ₹39,150) असू शकते.
परंतु हे लक्षात ठेवा की एक्सचेंज बोनसची रक्कम तुमच्या जुन्या फोनची स्थिती, मॉडेल आणि ब्रँड यावर अवलंबून असणार आहे. या फोनचा 12GB रॅम व्हेरिएंट अधिकृत साइटवर 41,999 रुपयांना उपलब्ध असून फोनवर एक्सचेंज बोनससोबतच अनेक बँक ऑफर्स आहेत.
जाणून घ्या खासियत
कंपनीचा हा फोन Couture Blue, Noir Black, Opera Mauve या तीन कलर ऑप्शनमध्ये लॉन्च केला असून जो खूप स्टायलिश आहे. या फोनमध्ये 6.73-इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला आहे, जो 120 Hz रिफ्रेश रेट, 480 Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 1500 nits पीक ब्राइटनेसला सपोर्ट करेल. या डिस्प्लेमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. डिस्प्ले गोरिला ग्लास व्हिक्टसद्वारे संरक्षित आहे.
या फोनमध्ये तीन मागील कॅमेरे दिले आहेत आणि तिन्ही 50 मेगापिक्सेल कॅमेरा लेन्स आहेत. तसेच सेल्फीसाठी फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा फोन Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज असून रॅम आणि स्टोरेजनुसार हा फोन 8GB 256GB आणि 12GB 256GB या दोन प्रकारांत लॉन्च केला आहे. यात शक्तिशाली आवाजासाठी क्वाड स्पीकर सिस्टम दिली आहे.
या फोनमध्ये 120W Xiaomi हायपरचार्ज सपोर्टसह 4600mAh बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचे असे मत आहे की बूस्ट मोडमध्ये फोन 18 मिनिटांत पूर्ण चार्ज होईल आणि स्टँडर्ड मोडमध्ये तो 24 मिनिटांत पूर्ण चार्ज होईल. या फोनमध्ये 50W वायरलेस चार्जिंग आणि 10W रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट दिला आहे. चार्जिंगसाठी यात यूएसबी टाइप-सी पोर्ट पाहायला मिळेल.