Kopergoan Crime : कोपरगाव तालुक्यातील शहाजापूर येथे सरपण ठेवल्याच्या रागात एका महिलेस मारहाण झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. याबाबत संगीता गोकुळ पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, तालुक्यातील शहाजापूर येथे फिर्यादी हे आपल्या 2 मुलासमवेत राहत असून मजुरी करत उपजीविका भागवत आहे. दरम्यान त्यांच्यात व आरोपी यांच्यात जागेवरून वाद सुरु असून (दि. २४) ऑक्टोबर रोजी साडेतीन वाजेच्या सुमारास फिर्यादी यांच्या मुलाने फिर्यादी यांना फोन करून सांगितले की आपल्या शेजारचे आरोपी प्रफुल्ल जगनाथ गडकर व माया प्रफुल गडकर हे मला शिवीगाळ करत आहे.
तू लवकर घरी ये हे असे सांगितल्याने फिर्यादी घरी गेले असता यातील दोन्ही आरोपी हे फिर्यादीच्या मुलास शिवीगाळ करत होते. तेव्हा फिर्यादी महिलेने आरोपी यांनी गडकर यांना शिवीगाळ का करत आहे.
असे विचारल्यानंतर गडकर यांनी म्हटले की ही जागा आमची आहे. तेथे तुम्ही सरपण का ठेवले ते उचलुन घ्या, असे म्हणाले तेव्हा मी त्यांना म्हणाले की, ही जागा आमची आहे.
मी येथेच सरपण ठेवणार, असे म्हणाल्याचा त्यांना राग येऊन त्यांनी मला व माझ्या मुलाला शिविगाळ करून प्रफुल जगन्नाथ गडकर याने त्यांच्या हातात असलेली लाकडी काढीने माझे डोक्यात पाठीवर,
पायावर मारहाण केली व माया प्रफुल गडकर हिने मला चापटीने मारहाण करून धक्काबुक्की करून तु येथे राहू नको.. नाहीतर तुला जिवे मारुन टाकु असा दम दिला आहे.
याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात वरील दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव पोलीस करत आहे.