Ajab Gajab News : सहारा वाळवंटात आहे पृथ्वीचा डोळा ! काय आहे रहस्य ?

Ajab Gajab News

Ajab Gajab News : जगभरात अनेक रहस्यमय ठिकाणे असून मानवाला अजूनही त्याविषयी माहिती नाही. तर ज्या ठिकाणांविषयी माहिती झाली आहे, त्याविषयीचे रहस्य कोणालाही कळू शकलेले नाही.

असेच एक रहस्य उत्तर अफ्रिकेतील सहारा वाळवंटातही आहे. सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट असून त्यामध्ये असलेल्या रिचॅट स्ट्रक्चरचे रहस्य अजूनही कायम आहे.

या रिचॅट स्ट्रक्चरला पृथ्वीचा डोळा किंवा सहारा वाळवंटाचा डोळा असे संबोधले जात असून आकाशातून हे रिचॅट स्ट्रक्चर हुबेहूब मानवी डोळ्याप्रमाणेच दिसते, मात्र त्यामागील रहस्य अजूनही उलगडलेले नाही.

आफ्रिकेच्या सहारा वाळवंटात, मॉरिटानियातील औदाडेनजवळ,निळ्या डोळ्यासारखी दिसणारी एक रचना आहे. या संरचनेला पृथ्वीचा डोळा किंवा सहारा वाळवंटाचा डोळा म्हणतात.

या शिवाय याला आफ्रिकेचा निळा डोळा म्हणूनही ओळखले जाते. ही डोळ्यासारखी रचना सहारा वाळवंटाच्या जवळजवळ मध्यभागी आहे. या रचनेचा आकार ५० किलोमीटर लांब आणि रुंद असून अंतराळातून ही रचना स्पष्टपणे डोळ्याप्रमाणेच दिसते.

एवढेच नाही तर सहारा वाळवंटात ते कसे तयार झाले, याविषयी अनेक मतमतांतरे आहेत, परंतु आजपर्यंत त्याचे रहस्य कोणालाही कळू शकलेले नाही. ही अनोखी रचना परग्रहवासीयांशीही जोडली असल्याचे तर्कही लावले जातात.

सुरुवातीच्या काळात ही एखाद्या लघुग्रहाच्या प्रभावाने बनलेली संरचना असल्याचे मानले जात होते. एवढेच नाही तर ज्वालामुखीच्या उद्रेकाने त्याची निर्मिती झाली असावी, असाही अंदाज लावला गेला.

परंतु, यामागील वास्तविक सत्य काय आहे? हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. दरम्यान, या रिचॅट स्ट्रक्चरमध्ये १ ते ४ मीटर रुंद आणि ३०० मीटर लांबीच्या ३२ पेक्षा जास्त कार्बोनेटाइट डाइक्स आहेत. रिचॅट फॉर्मेशनमधील काबोनेंट खडक १०४ दशलक्ष वर्षांपूर्वी तयार झाल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe