OnePlus Nord 3 5G : बाजारात अनेक OnePlus स्मार्टफोन लाँच होत असतात. कंपनीच्या स्मार्टफोनला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते. कंपनी मागणी आणि गरजेनुसार आपले स्मार्टफोन लाँच करत असते.
फोनची किंमत 33,999 रुपये इतकी आहे. परंतु हा सेल 3 हजार रुपयांपर्यंतच्या झटपट सूटसह उपलब्ध आहे. या सवलतीसाठी तुम्हाला ICICI बँक कार्डद्वारे पैसे द्यावे लागणार आहे.तसेच कंपनी फोनवर 3,000 रुपयांचे वेगळे कूपन डिस्काउंट देत आहे.
समजा तुम्ही रिलायन्स जिओचे वापरकर्ते असाल तर तुम्हाला 399 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनसह 4500 रुपयांचे फायदे मिळणार आहेत. तुम्हाला त्याचे तपशील वनप्लस वेबसाइटवर तपासता येतील. आनंदाची बाब म्हणजे हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कंपनी OnePlus Nord Buds 2r Triple Blue मोफत देत असून दिवाळी ऑफरमध्ये हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 6 महिन्यांसाठी Spotify Premium चे मोफत सबस्क्रिप्शन मिळत आहे.
जाणून घ्या OnePlus Nord 3 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
कंपनी या फोनमध्ये 2772×1240 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.74 इंचाचा AMOLED डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा फोन 16 GB पर्यंत LPDDR5x रॅम आणि 256 GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेजसह सुसज्ज असून यात प्रोसेसर म्हणून, तुम्हाला त्यात MediaTek डायमेंशन 9000 चिपसेट पाहायला मिळेल.
तसेच यात फोटोग्राफीसाठी, 50-मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच कंपनी सेल्फीसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत असून या फोनमध्ये दिलेली बॅटरी 5000mAh आहे. ही बॅटरी 80 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करत असून यात जोपर्यंत OS चा संबंध आहे, फोन Android 13 वर आधारित OxygenOS 13.1 वर काम करेल. कंपनीचा हा फोन मिस्टी ग्रीन आणि टेम्पेस्ट ग्रे या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये तुम्हाला खरेदी करता येईल.