Home Remedies : बदलत्या हवामानामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय?, करा ‘हा’ घरगुती उपाय !

Published on -

Effective Home Remedies for Cough : हळूहळू थंडी वाढू लागली आहे. या मोसमात बऱ्याच जणांना सर्दी आणि खोकला यांसारख्या समस्या जाणवतात. खरं तर या मोसमात कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे या समस्यांचा सामना करावा लागतो. म्हणूनच हवामान बदलले की खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैली बदलणे फार गरजेचे आहे.

जेव्हा हवामान बदलते तेव्हा आपल्या शरीराला त्याच्याशी जुळवून घेण्यास वेळ लागतो आणि अशा परिस्थितीत ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असते त्यांना असे रोग लवकर होतात. अनेक आयुर्वेदिक उपाय या ऋतूत सर्दी आणि खोकल्यापासून आराम देतात. आज आम्हीअशाच एका उपायाबद्दल सांगणार आहोत. चला तर मग…

सर्दी आणि खोकल्यापासून मुक्त होण्यासाठी घरगुती उपाय :-

सर्दी आणि खोकल्यापासून सुटका करण्यासाठी आवळा आणि मध खूप गुणकारी आहे, आवळा आणि मध यांचे पेय एकत्र घेतल्याने अशा समस्यांपासून सुटका मिळते. चला हे औषधी पेय बनवण्याची पद्धत जाणून घेऊया.

आवळा आणि मध यांचे औषधी पेय :-

-यासाठी 5 आवळा घ्या.
-त्याचे लहान तुकडे करा.
-मग ते मिक्सर मधून बारीक करून त्याचा रस बनवा.
-आता त्यात साधारण १ टेबलस्पून मध टाका
-हे पेय सकाळी रिकाम्या पोटी घ्या.
-तुम्ही ते जेवणापूर्वी आणि नंतर देखील घेऊ शकता.

फायदे :-

-याचे सेवन केल्याने तुम्हाला खोकला, सर्दी, ऍलर्जी आणि दमा यापासून आराम मिळेल.
-यामध्ये दोन गोष्टी वापरल्या जातात. प्रथम आवळा किंवा अमलाकी. हिवाळ्यातील हे सर्वोत्तम फळ आहे. तुम्हाला ते बाजारात सहज मिळेल.
-हे चवीला आंबट असते.
-आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे सर्दी-खोकला दूर होतो.
-आवळ्यामध्ये असलेल्या अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांमुळे ते जळजळ कमी करते आणि प्रतिकारशक्ती वाढवते.
-यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट मुरुमे दूर करतात आणि चेहऱ्यावर चमक आणतात.
-आवळा रक्त शुद्ध करतो आणि केस गळणे कमी करतो.
-मध चवीला गोड आणि पचायला सोपा असतो.
-त्याची प्रकृती उष्ण असून कफ व पित्त यांचे संतुलन राखते.
-सर्दी-खोकल्यापासून आरामातही हे फायदेशीर आहे.
-हे हिवाळ्यात त्वचेला कोरडे होण्यापासून वाचवते.
-या दोन गोष्टी एकत्र खाल्ल्याने हिवाळ्यात होणारे जवळपास सर्व आजार बरे होतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe