Krushi Yojana :- शेती व्यवसायाचा विकास व्हावा आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक योजना आखण्यात आल्या असून त्यांची अंमलबजावणी देखील केली जात आहे.
भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे शेती क्षेत्राचा विकास होणे खूप गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांना शेती व्यवसायासोबतच अनेक प्रकारचे शेती प्रक्रिया उद्योग आणि शेतीपूरक उद्योग उभारता यावेत याकरता देखील अर्थसहाय्य देणाऱ्या अनेक योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबवले जातात.

या व्यतिरिक्त जर या योजनेचा दुसऱ्या दृष्टिकोनातून फायदा पाहिला तर समाजातून बेरोजगारी हद्दपार करण्यासाठी देखील या योजना खूप फलदायी ठरू शकतात. कारण सुशिक्षित बेरोजगारांच्या तुलनेमध्ये उपलब्ध नोकऱ्याची संख्या खूपच अल्प प्रमाणात असल्याने सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग व्यवसाय उभारणी करिता आर्थिक सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून देखील या योजनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
याचा अनुषंगाने आपण शेतीपूरक व शेती प्रक्रिया उद्योग उभारण्याकरिता महत्त्वाचे असलेली एआयएफ अर्थात कृषी पायाभूत निधी योजना देखील खूप महत्त्वाची आहे व याच योजनेविषयी आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत.
शेती पूरक व्यवसायकरीता मिळेल दोन कोटी कर्ज
केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या फायद्याची कृषी पायाभूत निधी योजना सुरू करण्यात आली असून कृषी क्षेत्राशी संबंधित असलेल्या पायाभूत सुविधा उभारण्याकरिता या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते.
शेतीआधारित काही उद्योग उभे करायचे असतील तर युवकांना देखील या योजनेचा लाभ मिळतो. जर आपण कृषी पायाभूत निधी चे वैशिष्ट्य पाहिले तर यामध्ये सहा टक्के व्याजदराने 17 वर्षाच्या कालावधी करिता कर्ज मिळते.
विशेष म्हणजे या योजनेच्या माध्यमातून कमाल दोन कोटींपर्यंत कुठल्याही तारणाशिवाय तुम्हाला कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. तसेच तीन टक्क्यापर्यंत व्याज सवलत देखील दिली जाते.विशेष म्हणजे साठ दिवसांमध्ये कर्ज प्रक्रियेची पूर्तता करण्यात येते.
शासनाने या योजनेच्या माध्यमातून 2025-2026 या कालावधीपर्यंत एक लाख कोटींचे कर्ज वितरित करण्याचे टार्गेट समोर ठेवले आहे व या मधूनच व्याजदर सवलत आणि क्रेडिट हमी सहाय्य हे 2032 ते 33 पर्यंत दिले जाणार आहे.
या योजनेतून कुणाला मिळू शकतो कर्जाचा लाभ?
यामध्ये शेतकरी बचत गट,सहकारी संस्था तसेच उत्पादक गट आणि संयुक्तदायित्व गट इत्यादींना मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत दिली जाते. पायाभूत सुविधांशी संबंधित असलेला उद्योग उभारणीतून उत्पन्न वाढावे याकरिता तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून खूप मोठी मदत होत आहे.
कोणत्या कामासाठी मिळते आर्थिक मदत?
या योजनेच्या माध्यमातून शेतीचे उत्पादन वाढवणे तसेच पिकांची कापणी व शेतीमालाची साठवणूक करण्याकरिता लागणाऱ्या ज्या काही पायाभूत सुविधा आहेत त्यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्याच्या उद्देशाने कृषी पायाभूत निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे.
या माध्यमातून शेतकऱ्यांना कोल्ड स्टोरेज उभारणी तसेच शेती प्रक्रिया उद्योग, वेअर हाऊस व पॅकेजिंग युनिट उभारणी यासारख्या शेतीपूरक उद्योगांकरिता दोन कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.
या योजनेविषयी अधिकची माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या
https://agriinfra.dac.gov.in या वेबसाईटवर या योजनेविषयी अधिकची माहिती तुम्हाला मिळू शकते.