BSNL ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. अनेक वर्षांची प्रतीक्षा आता संपली आहे. BSNL ग्राहक बऱ्याच काळापासून ज्याची वाट पाहत होते ते तंत्रज्ञान अखेर बीएसएनएलने आणले आहे.
बीएसएनएल आता आपल्या ग्राहकांना 4G स्पीड देणार आहे. बीएसएनएल येत्या काही महिन्यांत भारतात 4G सेवा सुरू करणार आहे. म्हणजेच जर तुम्ही बीएसएनएलचे सिम वापरत असाल आणि स्लो स्पीडने तुम्ही त्रस्त असाल तर आता काळजी करण्याची गरज नाही.
जून 2024 पर्यंत भारतात बीएसएनएलचे 4G जाळे पसरणार
डिसेंबर 2023 पासून पंजाबमध्ये छोट्या प्रमाणात हे सुरू होईल, असे कंपनीने म्हटले आहे. जून 2024 पासून याची अंमलबजावणी होणार आहे. कंपनीने 200 ठिकाणी चाचण्या केल्या आहेत. आता पंजाबमध्ये तीन हजार ठिकाणी याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यानंतर हळूहळू 15हजार ठिकाणी नेण्याचा कंपनीचा मानस आहे.
* 5G वर ही सुरु आहे काम
एकीकडे बीएसएनएल 4G सेवेवर काम करत आहे, तर दुसरीकडे 5G साठीही प्लॅन तयार केले जात आहेत. जून 2024 नंतर 4G उपलब्ध होताच 5G ची तयारी अंतिम केली जाईल. कंपनीकडे आधीच 5G साठी स्पेक्ट्रम उपलब्ध आहे.
4G साठी TCS मदत करत आहे
TCS बीएसएनएलला 4G साठी मदत करत आहे. टीसीएसला बीएसएनएलकडून 19 हजार कोटी रुपयांच्या ऑर्डरही मिळाल्या आहेत. हे तंत्रज्ञान असे आहे की, कोणत्याही समस्येशिवाय ते 5G मध्ये रूपांतरित केले जाऊ शकते.
BSNL चे आहेत अनेक युजर्स
BSNL चे अनेक ग्राहक आहेत. BSNL ने मध्यंतरी अनेक स्कीम उदा. कृषी योजना आदी सारख्या अनेक योजना आणल्या होत्या. त्यामुळे BSNL अनेक ग्राहकांना आपल्याकडे वळवण्यात यशस्वी झाले होते. परंतु बऱ्याच लोकांना नेटवर्क समस्या होती. परंतु आता BSNL ने लवकरच 4G तंत्रज्ञान आणण्याची घोषणा केली आहे. त्याचा आता लाखो लोकांना फायदा होणार आहे.