Mukesh Ambani Net Worth : मुकेश अंबानी यांना तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. काल अर्थात सोमवारी पाठविलेल्या ई-मेलमध्ये त्यांना ४०० कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे.
ज्या आयडीवरून काही दिवसांपूर्वी २०० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, त्याच आयडीवरून हा ईमेल आला होता.
यापूर्वी मुकेश अंबानी यांना २० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. गेल्या चार दिवसातील ही तिसरी धमकी आहे. एका प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, आरोपींनी सांगितले आहे की, मागील ई-मेलला प्रतिसाद न मिळाल्याने खंडणीची रक्कम ४०० कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का की मुकेश अंबानी यांना प्रचंड सिक्युरिटी आहे. चला जाणून घेऊयात –
भारतात आणि परदेशात उच्चस्तरीय सुरक्षा
अलीकडेच, फेब्रुवारी २०२३ मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना देशात आणि परदेशात उच्चस्तरीय सुरक्षा प्रदान करण्याचे निर्देश दिले होते. त्याच्या कुटुंबाला Z+ स्तराची सुरक्षा देण्यात आली आहे.
याआधी सुरक्षेचा खर्च केंद्रीय गृह मंत्रालय उचलत होते. मात्र आता हा पैसा अंबानी कुटुंब स्वतः देत आहे. Z+ श्रेणीच्या सुरक्षिततेसाठी, कुटुंबातील प्रत्येक सदस्याला दरमहा 40 ते 45 लाख रुपये खर्च येतो.
सुरक्षेसाठी एनएसजीचे १० हून अधिक कमांडो तैनात
अंबानी कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी एनएसजीचे १० हून अधिक कमांडो, पोलिस अधिकारी आणि सीआरपीएफचे ५८ कमांडो अहोरात्र तैनात आहेत. कमांडोंकडे जर्मन बनावटीच्या हेक्लर अँड कोच एमपी 5 सब-मशीन गनसह विविध आधुनिक शस्त्रे आहेत.
एका मिनिटात ८०० गोळ्या झाडल्या जाऊ शकतात, यावरून या बंदुकीची कल्पना येऊ शकते. २०१३ ते २०२३ च्या सुरुवातीला अंबानी कुटुंबाला झेड ग्रेड सुरक्षा देण्यात आली होती. आता झेड+ सुरक्षा दिली जाते. अशी सेक्युरिटी ही देशातील सर्वात व्हीव्हीआयपी सुरक्षा आहे. यात 6 सेंट्रल सिक्योरिटी लेवल असतात.
अंबानी यांच्याकडे खासगी सुरक्षा रक्षक
मुकेश अंबानी यांच्याकडे १५ ते २० पर्सनल सिक्युरिटी गार्ड आहेत. हे सर्व सुरक्षारक्षक अंबानींसोबत राहतात. या सर्व सुरक्षारक्षकांना इस्रायली सुरक्षा यंत्रणांकडून प्रशिक्षण दिले जाते. अंबानी कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी हे सर्व रक्षक दोन शिफ्टमध्ये तैनात आहेत.
अंबानी यांच्या घराभोवतीचा संपूर्ण परिसर हाय रिझोल्यूशन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी व्यापला आहे. २०२१ मध्ये अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार सापडल्यानंतर त्यांची सुरक्षा पूर्वीपेक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा त्यांना धमकीचे ई-मेल येत आहेत.