Pune Ring Road : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वर्तुळाकार रस्त्याच्या (रिंग रोड) प्रकल्पाच्या भूसंपादनाला गती मिळाली आहे. भूसंपादनासाठी ड्रोनची मदत घेत आत्तापर्यंत ४५ कि.मी. पर्यंत सर्वेक्षण करण्यात आले आहे.
त्यामुळे प्रत्यक्ष माहिती, वेळ, खर्च आणि इतर कार्यवाही करताना मोठी कसरत करावी लागणार होती, ती टाळून पीएमआरडीएने रिंगरोडच्या भूसंपादनाचे काम वेगात सुरू केले आहे.
पीएमआरडीएच्या प्रस्तावानुसार खेड तालुक्यातील सोलू, निरगुडी आणि वडगाव शिंदे या तीन गावांच्या भूसंपादनासाठी जमीन मोजणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. थेट भूसंपादनासाठी सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे.
अचूक अक्षांश व रेखांश अचूक आणि कमी वेळेत मोजले जात आहे. तसेच परिसर, तेथील झाडांची संख्या, तळी, तलाव, ओढे, नाले नद्या यांची अचूक माहितीची नोंद करण्यात येत आहे. प्रचलित पद्धतीनुसार होणारी भूसंपादनाची मोजणी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने होत असून कमी वेळेत अचूक जमीन मोजणी होऊन मोबदला देताना त्याद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे देणे शक्य होणार होत आहे.
त्यानुसार पहिल्या टप्प्यात या तीन गावांमधील भूसंपादन करण्यात येणार असून हा टप्पा पूर्ण झाल्यावर तो एमएसआरडीसीच्या परंदवडी ते सोलू या रिंगरोडच्या टप्प्याला जोडण्यात येणार असल्याचे पीएमआरडीकडून सांगण्यात आले.