LPG Price : महागाईचा झटका ! गॅस सिलिंडरच्या किमतीत 101 रुपयांची वाढ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Commercial LPG Price hikes : नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका बसला आहे. तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी) देशात 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ केली आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 101.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. नवे दर 1 नोव्हेंबर 2023 पासून अर्थात आजपासून लागू होतील. या वाढीनंतर राजधानी दिल्लीत 19 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत 1833 रुपये झाली आहे. यापूर्वी 1 ऑक्टोबर रोजी गॅस सिलिंडरच्या दरात 209 रुपयांची वाढ करण्यात आली होती.

घरगुती गॅस च्या दरात कोणताही बदल नाही

तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ केली आहे, परंतु घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीत 14 किलोचा एलपीजी सिलिंडर 903 रुपये, मुंबईत एलपीजीची किंमत 902.5 रुपये आहे, तर चेन्नईमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 918.5 रुपये आहे.

प्रमुख शहरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर

या भाव वाढीनंतर दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1833 रुपये झाली आहे. कोलकात्यात 19 किलोच्या गॅस सिलिंडरची किंमत 1943 रुपये झाली आहे. मुंबईत गॅस सिलिंडरची किंमत 1785.50 रुपये आणि चेन्नईत 1999.50 रुपये असेल.

पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल नाही

तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. दिल्लीत आज पेट्रोल चा दर 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लीटर आहे. दिल्लीत पेट्रोल चा दर 101.64 रुपये प्रति लीटर तर डिझेलचा दर 89.07 रुपये प्रति लीटर आहे.

मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतील शेवटचा बदल 21 मे 2022 रोजी झाला होता.

विमान इंधनाच्या दरात कपात

तेल विपणन कंपन्यांनी विमान इंधनाच्या दरात कपात केली आहे. एव्हिएशन टर्बाइन फ्यूल म्हणजेच एटीएफच्या दरात प्रति किलोलिटर 1074/KL रुपयांची कपात करण्यात आली आहे. नवे दर 1 नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत.

या कपातीनंतर लोकांना मोठा दिलासा मिळू शकतो कारण विमान कंपन्या विमान प्रवास स्वस्त करू शकतात.