Wedding Share : लग्न दुसऱ्यांचे मालामाल व्हाल तुम्ही ! ‘या’ शेअर्समधील गुंतवणूक बनवेल श्रीमंत

Ahmednagarlive24 office
Published:

Share Market : देशात लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. येत्या काही दिवसांत अनेक कुटुंबांत लग्न समरमभ होतील. लग्नाच्या निमित्ताने लोक भरपूर खरेदीही करतात. भारतात दरवर्षी लग्नासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. पण याचा तुम्ही फायदा उठवू शकता. लग्नसराईत तुम्ही शेअर्सच्या माध्यमातून मालामाल होऊ शकता. कसे ते जाणून घेऊयात –

खरं तर लोक लग्नासाठी खूप पैसे खर्च करतात. या दरम्यान लोक काही ठराविक कंपन्यांची प्रॉडक्ट जास्त खरेदी करत असतात. अशावेळी त्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास चांगले पैसे मिळू शकतात. चला तर मग जाणून घेऊया या लग्नाच्या हंगामात कोणत्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून चांगला रिटर्न मिळवून तुम्ही मालामाल होऊ शकता.

टायटन – लग्नाच्या सीझनमध्ये लोक टायटन प्रॉडक्टची ही भरपूर खरेदी करतात. टायटनला सर्वाधिक महसूल दागिन्यांमधून मिळतो. टायटन आपल्या Tanishq, Zoya, Mia आणि Caratlane या ब्रँडच्या माध्यमातून दागिन्यांची विक्री करते. सणासुदीच्या काळात आणि लग्नसराईच्या काळात टायटनच्या उत्पादनांची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढते. अशा परिस्थितीत दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी टायटनचे शेअर्स खरेदी करता येतील.

इंडियन हॉटेल्स : गेल्या काही वर्षांपासून लग्न समारंभाच्या माध्यमातून हॉटेल इंडस्ट्रीही चांगली कमाई करत आहे. महागड्या हॉटेलमध्ये लोक लग्न करतात, त्यामुळे हॉटेल इंडस्ट्रीला चांगले पैसे मिळत आहेत. भारतातील सर्वात मोठ्या हॉस्पिटॅलिटी कंपन्यांमध्ये भारतीय हॉटेल्सची गणना केली जाते. ताज हॉटेल हाही त्यापैकीच एक ब्रँड आहे. अशा तऱ्हेने हॉटेल्समध्येही लग्नसमारंभ होताना दिसत आहेत. अशावेळी आपल्या पोर्टफोलिओमध्ये इंडियन हॉटेल्सचाही समावेश तुम्ही करू शकता.

वेदांत फॅशन : जेव्हा लग्नाचा विषय येतो तेव्हा सर्वात आधी लक्ष जाते ते चांगल्या कपड्यांवर. लग्नाच्या निमित्ताने प्रत्येकजण छान, सुंदर आणि नवीन कपडे परिधान करतो. त्याचबरोबर लग्नसमारंभात वधू-वरांच्या कपड्यांवर भरपूर पैसा खर्च केला जातो. अशातच शेअर बाजारात फॅशनशी संबंधित एक शेअरही आहे, ज्याचे नाव वेदांत फॅशन आहे. Manyavar, Mohe आणि Manthan हे वेदांताचे फॅशन ब्रँड असून ते लग्नाचे कपडे विकतात. अशावेळी त्यांचेच शेअर्सही पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट केले जाऊ शकतात.

(डिस्कलेमर : कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या. आम्ही येथे गुंतवणुकीचा सल्ला देत नाही.)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe