Ahmednagar Police : अल्पवयीन मुलीस त्रास देणारा अटकेत ! महिला, मुलींची छेडछाड केल्यास पोलिसांना ह्या नंबरवर करा संपर्क

Published on -

Ahmednagar Police : अल्पवयीन मुलीस व्हॉट्स अॅप, फेसबुक, इंस्टाग्रामद्वारे मेसेज करून त्रास देणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपी हा भिंगार वेस येथे बसलेला असताना कोतवाली पोलिसांनी सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतले.

सर्फराज बाबा शेख (वय २३, रा. आलमगिर, अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे. अल्पवयीन मुलगी मूळची बुलढाणा येथील रहिवाशी आहे. तिच्या फिर्यादीवरून ३० ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल झाला होता.

आरोपीने अल्पवयीन मुलीच्या मोबाईलवर मेसेज करून त्रास दिला होता. तसेच जीवे मारुन टाकण्याची धमकी दिली होती. कोतवाली पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३५४ ड ५०६ बालकांचे लैंगिक अपराधापासुन सरंक्षण अधिनियम २०१२ चे कलम ११,१२ पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास करीत असताना आरोपी हा भिंगार येथे वेशीमध्ये बसलेला असल्याची माहिती कोतवाली पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला सापळा लावून ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोहेकॉ. तनवीर शेख, पोहेकॉ. गणेश धोत्रे, पोना. योगेश भिंगारदिवे,

पोना. इस्त्राईल पठाण, पोकॉ. अभय कदम, पोकॉ. कैलास शिरसाठ, पोकॉ. सोमनाथ राउत, पोकॉ. सुजय हिवाळे, पोकॉ. अतुल काजळे, राहुल गुंडू, स्थानिक गुन्हे शाखेचे सफौ. राजेंद्र वाघ, पोना. रवी कर्डीले, पोना, विशाल दळवी यांच्या पथकाने केली.

थेट तक्रार करा

महिलांची अथवा मुलींची छेडछाड केल्यास अथवा व्हॉटस ॲपवर अश्लिल मेसेज टाकल्यास अथवा जाणुनबुजून त्रास दिल्यास थेट तक्रार करावी, असे आवाहन कोतवाली पोलिस ठाण्याचे पोनि. चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.

तक्रार प्राप्त झाल्यास गुन्हेगारावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. सदरील नंबरवर ७७७७९२४६०३ मेसेज करून तक्रार करावी. तक्रारदार महिलेचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe