Ahmednagar News : कोल्हे कारखान्याने गेल्या ६१ वर्षात अनेक चढ-उतार पाहिले असून स्व. शंकरराव कोल्हे यांच्याकडून या संकटावर मात करण्याचे बाळकडू मिळाले आहे.
खाजगीकरणाचे वाढते जाळे आणि स्पर्धात्मक युगात जागतिक आवाहने व नैसर्गिक अडचणीला सामोरे जात जिल्ह्यात उसाला उच्चांकी भाव देणार असल्याची ग्वाही सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी दिली.
येथील कोल्हे कारखान्याच्या ६१व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी शेतकरी सभासदांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे उपस्थित होते.
प्रारंभी ६१ व्या गळीत हंगामाची पूजा कारखान्याची जेष्ठ संचालक निवृती बनकर व मंदाताई बनकर या उभयतांच्या हस्ते करण्यात आली. कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी प्रास्ताविक केले.
याप्रसंगी विवेक कोल्हे म्हणाले, सहकारी कारखानदारी साखर कारखाना व्यवस्थापन कर्मचारी शेतकरी व सरकारी धोरण या तीन चाकावर चालते. ज्यावेळेस कारखाने कमी दिवस चालतात.
त्यावेळेस कारखान्यावर तोटा सहन करण्याची पाळी येते. खर्च वाढल्यामुळे तोटा सहन करण्याची पाळी येते. परंतु शंकरराव स्व. शंकरराव कोल्हे यांनी तोटा आला तरी चालेल पण सभासदांच्या हितासाठी कारखाना चालला पाहिजे ही भूमिका कायम ठेवली.यासाठी त्यांनी उपपदार्थ निर्मिती केली.
परंतु तात्कालीन सरकारी धोरणामुळे अनेक उपपदार्थ निर्मिती बंद करावी लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व सहकार मंत्री केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी साखर कारखान्याबाबत घेतलेल्या धोरणामुळे साखर दराबरोबरच ऊस दराबरोबरच साखर दर निश्चित केल्यामुळे साखर कारखानदारीला चांगले दिवस आले आहेत.
याप्रसंगी बिपीन कोल्हे म्हणाले की, गेली ४० वर्ष स्व. शंकरराव कोल्हे यांनी पाण्यासाठी लढा दिल्यामुळेच तुम्हाला आम्हाला पाण्याची झळ लागली नाही. परंतु २००५ साली झालेल्या समन्यायीच्या काळ्या कायद्यामुळे दर चार वर्षांनी कारखाने अडचणीत यायला लागले.
आज पाणी गेले तर शेती सोडाच प्यायला पाणी मिळणार नाही. तेंव्हा आता पाण्यासाठी लढावेच लागेल. पाण्यासाठी उपसलेली तलवार पाणी घेऊनच म्यान करणार असल्याचे सांगितले.
आज सगळेच सत्ताधारी असल्याने भांडायचे कोणाशी असे असले, तरीही जो कोणी पाण्याचा प्रश्न सोडवील, आम्हीही बरोबर येऊ, त्यांनी म्हणे मंत्री पदाच्या अपेक्षेने, पक्ष बदलला. आम्ही मात्र कोपरगावच्या पाण्यासाठी पक्ष त्याग केला. – विवेक कोल्हे