Ahmednagar News : कारखाना टिकला तरच आपण शेतकरी जगू शकू ! तरच तालुक्यातील कारखानदारी जिवंत…

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : नेवासा तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखाना या दोन्ही कारखान्याच द्यावा, असे आवाहन शिवसेना (ठाकरे गट) जिल्हा उपप्रमुख हरिभाऊ शेळके त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले.

याबाबत पत्रकारांशी बोलतानी शेळके म्हणाले की, ज्ञानेश्वर कारखान्याने नेवासा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना उभे करण्याचे काम केलेले आहे. स्व. मारुतरावजी घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली

त्यावेळेच्या परिस्थितीत शेतकऱ्याला जायकवाडी बॅक वॉटर वरून पाईपलाईन करण्यासाठी ज्ञानेश्वर कारखान्याने तांत्रिक सहाय्य करून १० टक्के रक्कम ही स्वतः भरून जिल्हा सहकारी बँके मार्फत सर्व शेतकऱ्यांच्या पाईपलाईन करून देण्याचे काम केलं.

त्यामुळेच बॅक वॉटरच्या कडेला असलेले सर्व शेतकरी खऱ्या अर्थाने उभा राहिला, स्वंयमपूर्ण व तालुक्याचा ही विकास झाला. म्हणून नेवासा तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे की, बाहेरचे साखर कारखाने आपल्या तालुक्यात येतात आणि प्रत्येक वेळेस ऊस घेऊन जातात, ते ऊस घेऊन जातात.

परंतु ज्या वेळेस त्यांच्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अतिरिक्त ऊस होतो. त्यावेळी ते आपल्याकडे ऊस घ्यायला येत नाहीत. त्यांच्या वजन काटयावर आपण कधी प्रत्यक्ष वजन केलेले नाही, आपण कधी त्या ठिकाणी जाऊन ऊस वजन पाहिलं नाही.

ज्ञानेश्वर आणि मुळा कारखाना टिकला तरच आपण शेतकरी या ठिकाणी जगू शकू. म्हणून आता ऊस टंचाईचे संकट असताना शेतकऱ्यांनी सर्व ऊस ज्ञानेश्वर व मुळा कारखान्याला दिला पाहिजे. तरच तालुक्यातील कारखानदारी जिवंत राहिल.

कारखान्याच्या माध्यमातून आपल्याच कुटुंबातील अनेक कर्मचारी, छोटे-मोठे दुकानदार, व्यावसायिक व शेतकरी आनंदी रहातील. म्हणून तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपला ऊस नेवासा तालुक्यातीलच ज्ञानेश्वर आणि मुळा कारखान्यालाच द्यावा, इतर कारखान्याला देऊ नये, असे आवाहन शेळके यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe