पन्नास वर्षानंतर निळवंडेच्या डाव्या कालव्यातून पाणी !

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव नगर, नाशिक जिल्ह्यातील कोपरगाव, अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी, श्रीरामपूर व सिन्नर या सात तालुक्यातील दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या व ६८,८४८ हजार हेक्टर क्षेत्राचा सिंचनाचा प्रश्न कायम स्वरूपी सोडविणाऱ्या निळवंडे कालव्यांच्या कामांना गती मिळावी,

यासाठी आ. आशुतोष काळे यांनी वेळोवेळी केलेला पाठपुरावा, अधिकाऱ्यांच्या वारंवार घेतलेल्या बैठका आणि अडचणीच्या वेळी केलेल्या मदतीतून अखेर पन्नास वर्षांनंतर निळवंडेच्या डाव्या कालव्यातून काल गुरूवारी पाणी आले.

लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू त्यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली. काल गुरुवारी (दि. २) कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे व्हा. चेअरमन डॉ. मच्छिद्र बर्डे यांच्या हस्ते पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता विवेक लव्हाट, महेश गायकवाड, सहाय्यक अभियंता कदम यांच्या उपस्थितीत नारळ फोडून पाणी सोडण्यात आले आहे.

यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या जिरायती भागातील नागरिकांनी डी. जे. च्या तालावर ठेका धरत एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला. पाच दशकापासूनचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे कोपरगाव मतदार संघाच्या निळवंडे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील नागरिकांनी आनंद व्यक्त करीत कालव्याचे पाण्यात उभे राहून आ. काळे यांचे आभार मानले आहे.

निळवंडे कालव्यांच्या कामांना गती देण्यासाठी निळवंडे समितीचे सदस्य असलेल्या माजी खा. कर्मवीर शंकरराव काळे व माजी आमदार अशोक काळे यांनी देखील विरोधी पक्षाचा आमदार असतांना त्यांच्या कार्यकाळात निळवंडेच्या कामाला गती देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. निळवंडे कालवा कृती समिती व निळवंडेच्या त्या-त्या लाभक्षेत्रातील विद्यमान लोकप्रतिनिधी या नात्याने निळवंडे कालवे तातडीने पूर्ण व्हावेत यासाठी आ. आशुतोष काळे यांनी देखील देखील पाठपुरावा केला आहे.

यावर्षी कोपरगाव मतदार संघात अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे भविष्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणार होते. त्यामुळे १०० टक्के भरलेल्या निळवंडे धरणातून डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्राच्या गावातील बंधारे, साठवण तलाव, पाझर तलाव भरून घेतले,

तर प्रशासनाचा त्रास कमी होवून टँकर सुरु करण्याची वेळ टाळता येवू शकते, या दूरदृष्टीतून आ. आशुतोष काळे यांनी निळवंडे डाव्या कालव्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करून ज्या ठिकाणी काम सुरु आहे. त्या कामाला गती देण्याच्या सूचना केल्या होत्या.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन डॉ. मच्छिद्र बर्डे यांच्या हस्ते पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता विवेक लव्हाट, महेश गायकवाड, सहा. अभियंता कदम यांच्यासह निळवंडेच्या डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील काकडी,

मल्हारवाडी, डांगेवाडी, मनेगाव, रांजणगाव देशमुख, वेस, सोयेगाव, अंजनापूर, बहादरपूर, धोंडेवाडी, जवळके, शहापूरचे शेतकरी, नागरिक व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe