आता चार्जरची गरज नाही ! ‘हे’ डिव्हाईस 10 वेळा फुल करेल तुमचा मोबाईल, पहा किंमत व फीचर्स

Ahmednagarlive24 office
Published:

मोबाईलला वारंवार चार्ज करण्याच्या समस्येपासून पॉवर बँकेने सुटका केली. पॉवर बँक सोबत असली की मोबाईल कुठेही, कधीही चार्ज होऊ शकतो. बाजारात सध्या 10 ते 20 हजार mAh च्या पॉवर बँक आहेत.

आता 60,000 एमएएच बॅटरी असलेली पॉवर बँक बाजारात आली आहे. यामुळे तुमचा फोन 10 वेळा फुल चार्ज होईल. बॅटरी उत्पादक कंपनी Duracell ने दोन पॉवर बँक बाजारात आणल्या आहेत.

दोघांची डिझाईन बॅटरीसारखी आहे. एकदम युनिक रचना आहे. दोन नवीन ड्युरासेल पॉवर बँक्स बिल्ट-इन MagSafe चार्जरसह M150 आणि 60,000mAh बॅटरी क्षमतेसह M250 असे दोन पॉवर बँक आहेत. चला जाणून घेऊया किंमत आणि फीचर्स…

 फीचर्स
Duracell M150 ही एक शक्तिशाली पॉवर बँक आहे जी तुमच्या सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांना चार्ज करण्यासाठी पुरेशी बॅटरी प्रदान करते. त्याची क्षमता 25,000mAh इतकी आहे, जी स्मार्टफोनला सहा वेळा किंवा लॅपटॉप एकदा पूर्णपणे चार्ज करण्यासाठी पुरेशी आहे.

M150 मध्ये दोन USB-C पोर्ट आहेत, जे अनुक्रमे 100W आणि 60W चार्जिंग देतात. याव्यतिरिक्त, दोन USB-A पोर्ट आहेत, ज्यापैकी प्रत्येकाला 18W चार्जिंग देण्यासाठी रेट केले आहे. Duracell M250 ची क्षमता 60,000mAh आहे, त्याची रचना देखील M150 सारखीच आहे. यात 1 एलईडी रिंग लाइट आहे. पॉवरबँक 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. चार्जर ठेवण्यासाठी यात स्टोरेज देखील आहे.

 Duracell पॉवर बॅंक्स किंमत
Duracell M150 पॉवर बँकची US मध्ये किंमत $199 (रु. 16,567) आहे, तर M250 ची किंमत $299 (रु. 24,891) आहे. यामुळे M150 पेक्षा M250 सुमारे $100 अधिक महाग आहे.

 पॉवरबँकेमुळे फोन चार्जिंगची समस्या संपली
बाहेर पडताना किंवा बाहेर फिरायला जाताना फोन चार्जिंग आहे की नाही हे पाहावे लागे. परंतु आता ही देखील समस्या संपली आहे. पॉवरबँक सोबत असली की मोबाईल फटाफट चार्जिंग करता येत लॉन्ग ड्राइव्ह किंवा पिकनिकसाठी बाहेर जाणे झाले तर ही पॉवरबँक चांगली सपोर्टेबल होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe