Jio ने आपल्या ग्राहकांना मोठे गिफ्ट दिले आहे. हे असे गिफ्ट आहे की, तुम्ही याचा विचारही करू शकत नाहीत. Jio आपल्या ग्राहकांना त्यांच्या इच्छेनुसार स्वत:चा मोबाईल नंबर तयार करण्याची संधी देत आहे. म्हणजेच जर तुम्हाला तुमचा लकी नंबर, वाढदिवस किंवा कोणत्याही खास दिवसाची तारीख असलेला मोबाईल नंबर हवा असेल
तर तुम्ही तो आता घेऊ शकता. आतापर्यंत कंपनीने दिलेला नंबर आपल्याला एक्सेप्ट करावा लागे. पण आता तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरचे तुम्ही स्वतः मालक असणार आहात. ही सेवा आतापर्यंत जिओ पोस्टपेड ग्राहकांसाठी होती, मात्र आता प्री-पेड ग्राहकांसाठीही लागू करण्यात आली आहे.
आता तुमच्या आवडीचा नंबर कसा घ्यायचा ती प्रक्रिया जाणून घ्या –
– सर्वप्रथम जिओच्या वेबसाईटवर https://www.jio.com जाऊन सेल्फ केअरवर क्लिक करावं लागेल.
यानंतर एक वेगळी विंडो ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा सध्याचा मोबाईल नंबर टाकून मिळालेला ओटीपी व्हेरिफाय करावा लागेल.
– व्हेरिफिकेशन नंतर तुम्हाला तुमच्या आवडीचे 4 ते 5 अंक विचारले जातील, तुमच्या शहराच्या पिन कोडचा तपशीलही द्या.
– यानंतर Show Available Numbers वर क्लिक करा, त्यानंतर तुम्हाला 0007 शी संबंधित 7 ते 8 क्रमांकांची यादी दिसेल. यापैकी कोणताही नंबर तुम्ही निवडू शकता.
ग्राहकांना जोडण्यासाठी नवीन टेक्निक
ग्राहकांसाठी ही सुविधा पूर्णपणे मोफत आहे. जिओने येथे एक शानदार प्लॅन आणला आहे. टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांना बाजारपेठेशी जोडून ठेवण्यासाठी नाविन्यपूर्ण योजनांवर काम करत आहेत. एअरटेलसोबतच व्होडाफोनदेखील ग्राहकांसाठी असेच प्लॅन नेहमी आणत असते.
जिओने अवघ्या दोन वर्षांत कमाल केली
जबरदस्त प्लॅनिंगमुळे जिओ अवघ्या वर्षभरात भारतातील अव्वल टेलिकॉम कंपन्यांपैकी एक बनली होती. ट्रायच्या आकडेवारीनुसार, जिओने 2016 ते 2018 या वर्षात व्होडाफोन आणि एअरटेलचे 30 टक्के ग्राहक आपल्याकडे जोडले होते.