Navalben Chaudhary Story : केवळ दूध विकून ‘ही’ 62 वर्षीय महिला कमावतेय करोडो रुपये

Ahmednagarlive24 office
Published:

व्यवसाय करण्यासाठी कोणत्याही पदवी किंवा मोठ्या शिक्षणाची गरज नसते, तर व्यवसाय करण्यासाठी अनुभव, विश्वास आणि मेहनत लागते हे आपण बऱ्याचवेळा ऐकले असेल.

वयाच्या 62 व्या वर्षी बहुतेक लोक घरात बसतात आणि शांततेत आयुष्य जगतात. परंतु आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एका महिलेची यशोगाथा घेऊन आलो आहोत जिने 62 व्या वर्षी दूध विक्री सुरु केली व ती यातून आता करोडो रुपये कमावत आहे.

येथे आपण नवलबेन चौधरी नावाच्या 62 वर्षीय महिलेबद्दल बोलत आहोत, जी गुजरात राज्यातील नगला या छोट्याशा गावात राहते. नवलाबेन चौधरी यांनी वयाच्या अवघ्या 62 व्या वर्षी दुग्ध व्यवसाय सुरू करून लोकांसमोर आदर्श निर्माण केला आहे, कारण या वयात त्यांनी एक कोटी रुपयांचा दुग्ध व्यवसाय केला आहे. म्हणूनच आजच्या लेखात आपण नवलबेन चौधरी यांची यशोगाथा पाहणार आहोत –

वयाच्या 62 व्या वर्षी स्वत:चा दुग्ध व्यवसाय
गुजरात राज्यातील नगला या छोट्याशा गावात राहणाऱ्या नवलबेन चौधरी यांनी वयाच्या 62 व्या वर्षी आपल्या गावात दुधाचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि आज या दूध व्यवसायातून त्या कोट्यवधी रुपये कमावतात.

वयाच्या पन्नाशीनंतर लोक कामावरून निवृत्त होत असतात पण नबलबेन चौधरी यांनी अनेकांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे आणि आज त्या सर्वांसाठी प्रेरणास्थान बनल्या आहेत. नबलबेन चौधरी यांनी दुधाचा व्यवसाय सुरू केला तेव्हा त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले, पण नबलबेन यांनी हार मानली नाही आणि आपला व्यवसाय सुरूच ठेवला, ज्यामुळे त्यांचा व्यवसाय आज कोट्यवधींचा झाला आहे.

कोट्यवधींची कंपनी स्थापन केली
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवलबेन चौधरी यांनी 2020 आणि 2021 मध्ये 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे दूध विकले आहे. सध्या नबलबेन चौधरी आपल्या Diary Business मधून दरमहा लाखो रुपये कमावत आहेत, तसेच अनेकांना रोजगाराच्या संधी देत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe