आधार, एटीएम कार्ड, बँक डिटेल्स लीक झाले तरीही बँक अकाउंट होणार नाही हॅक ! पहा..

Tejas B Shelar
Published:

सध्या अनेक डिजिटल सुविधा निघाल्या आहेत. यामुळे जीवनमान अगदी सुसह्य झाले आहे. अनेक कामे अगदी सोपे झाली आहेत. परंतु यात एक मोठी समस्या निर्माण झाली आहे ती म्हणजे, जसजसा भारत डिजिटल होत आहे, तसतसे फसवणुकीचे प्रमाण वाढत चालले आहे.

अनेकांच्या ऑनलाईन फसवणूक झालेल्या बातम्या आपण बऱ्याचदा ऐकतो. आरबीआयच्या अहवालानुसार, भारतात दररोज सायबर फसवणुकीच्या एक हजाराहून अधिक घटना घडतात. त्यामुळे आजच्या काळात सावधगिरी बाळगल्यास अशा फसवणुकीपासून आपला बचाव होऊ शकतो.

2016 पासून भारतात डिजिटल व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आणि यूपीआय सिस्टीम आल्यापासून तर यात कमीच नाही. कॅश व्यवहार तर अगदी नगण्य होत आहेत. त्यामुळे आज आपण अशाच एका खबरदारीबद्दल माहिती पाहणार आहोत, ज्याकडे ग्राहक फार कमी लक्ष देतात. याने तुमचे आधार आणि एटीएम कार्ड आणि बँक डिटेल्स लीक जरी झाले तरी पण तुमचे खाते सुरक्षित राहील.

OTP ही तुमची ताकद
बँकांनी ग्राहकांना ओटीपी अर्थात वन टाइम पासवर्डची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही एकप्रकारे सुरक्षा ढाल आहे जी तोडणे कठीण आहे. पण जर तुम्ही स्वत: कुणाला तुमचा ओटीपी सांगितलात तर ते तुम्हाला नुकसानकारक ठरेल. त्यामुळे आपल्याकडून कोणतीही चूक करू नका.

OTP वर पण सायबर चोरांकडे उपाय
सध्या हॅकर्स मोबाइल हॅक करून ओटीपी काढून घेतात. त्यामुळे फोनची विशेष काळजी घ्या. आता प्रश्न असा आहे की, हॅकर्स कोणाचा व कसा फोन हॅक करतात?

अशा प्रकारे होतो फोन हॅक
फोन हॅकिंग दोन प्रकारचे असते. एकतर हॅकर्सच्या ताब्यात तुमचा फोन जाणे. किंवा त्याने पाठवलेल्या लिंकवर क्लिक केल्यास व्हायरस तुमच्या फोनमध्ये येतो आणि फोन हॅक होतो. पहिली पद्धत खूप अवघड आहे, कारण आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांना फोन देत नाही तर तो हॅकर्सना आपण कधी देणार.

आता उरली दुसरी पद्धत. म्हणजेच हॅकर्सनी पाठवलेली लिंक. असे होते की तुम्ही त्या लिंकवर क्लिक करताच, एक मालवेअर म्हणजेच सोप्या भाषेत व्हायरस तुमच्या फोनमध्ये प्रवेश करतो. मालवेअरचे काम म्हणजे तुमच्या फोनची माहिती त्याच्या मालकाला म्हणजेच हॅकर्सना पाठवणे. समजा तुमचा तपशील हॅकर्सकडे आहे, तुमच्या फोनवर OTP येईल आणि मालवेअरद्वारे OTP काय आहे हे हॅकर्सना कळेल. यामुळे तुमचे खाते रिकामे होईल.

सरकारी वेबसाइटची मदत घ्या
त्यामुळे तुमच्या फोनमधील कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. तुमच्या फोनमध्ये व्हायरस येण्याची शक्यता असते. यात सरकारही तुम्हाला मदत करत आहे. फोनमध्ये असा काही व्हायरस आहे का हे पाहण्यासाठी

तुम्ही सरकारी वेबसाइट Cyber Swachhta Kendra: Security Tools (csk.gov.in) वर जाऊन आपला फोन स्कॅन करू शकता. येथे तुम्हाला तुमच्या फोनची सुरक्षितता भंग करणाऱ्या व्हायरसचा तुमच्या फोनमध्ये समावेश झाला आहे का हे समजेल. व तुमचा फोन सुरक्षित राहील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe