Tata ला टक्कर द्यायला आली Bajaj ची सर्वात स्वस्त कार, 36 चे मायलेज व जबरदस्त फिचर्स

Tejas B Shelar
Published:

सध्या अनेकांना आपली स्वतःची कार असावी असे स्वप्न असते. परंतु अनेकांकडे कार घेण्यासाठी आर्थिक बजेट नसते. पण आता तुमचे स्वप्न पूर्ण होईल. याचे कारण असे की Bajaj ने स्वस्त सेगमेंटमधील कार आणली आहे.

टाटा मोटर्स ही भारतातील सर्वात स्वस्त कार बनवण्यासाठी ओळखली जाते, पण आता बजाज त्यांना या बाबतीत कडवी टक्कर देणार आहे.

कारण त्यांनी देशातील सर्वात स्वस्त कार लाँच केली आहे, जी गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी सर्वोत्तम पर्याय असल्याचे म्हटले जात आहे.

TATA बद्दल बोलायचे झाले तर त्यांची सर्वात स्वस्त कार नॅनो होती, ज्याचे उत्पादन थांबवण्यात आले होते. पण त्यानंतर गरिबांना कमी पैशात गाडी मिळणे खूप अवघड झाले,

कारण बाजारात अशी गाडी नव्हती. पण आता बजाजने गरिबांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. चला तर मग ही कोणती कार आहे व त्याचे फिचर्स जाणून घेऊयात –

Bajaj Qute Car

भारतातील प्रत्येकाला बजाजबद्दल माहिती आहे कारण ती भारतातील सर्वात लोकप्रिय ऑटोमोबाईल कंपनी आहे. बजाज विशेषतः बाईकच्या उत्पादनासाठी ओळखले जातात,

परंतु आता त्यांनी एक अशी कार बनवली आहे जी गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी सर्वोत्तम पर्याय मानली जाते.

कंपनीने या कारला Bajaj Qute असे नाव दिले आहे, ज्यात पैशाच्या मानाने अनेक उत्कृष्ट फीचर्स आहेत.

Bajaj Qute Car सिंगल सिलिंडर 216cc इंजिन आणि 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. या कारमध्ये सीएनजी इंजिन आहे.

त्याचबरोबर त्याला 35 लिटर क्षमतेची इंधन टाकी देण्यात आली आहे.

Bajaj Qute Car मायलेज आणि किंमत

सीएनजीच्या मदतीने ही कार ऑपरेट करता येणार आहे. याचे मायलेज 36 किमी प्रति तास आहे. म्हणजेच ही कार एक लिटर सीएनजीमध्ये 36 किलोमीटरचे अंतर कापू शकते.

Bajaj Qute कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर त्याची किंमत 3.5 लाख रुपयांपर्यंत असेल. ही कार बाजारात उपलब्ध असून यात चार जण एकत्र प्रवास करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe