Walking On Grass : गवतावर अनवाणी चालण्याचे आहेत हे फायदे, जाणून घ्या सविस्तर..

Ahmednagarlive24 office
Published:

Walking On Grass : व्यायाम करणे आपल्या शरीरासाठी फायद्याचे असते. यासाठी डॉक्टर नेहमी चालण्याचा सल्ला देतात. जर तुम्ही गवातावरती चालत असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्ही गवतावर अनवाणी चालणे आवश्यक आहे. गवतावर अनवाणी चालण्याचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. जाणून घ्या याबद्दल.

गवतावर अनवाणी चालल्यामुळे फक्त आपला व्यायामच नाही होत तर आपल्या शरीरास अनेक प्रकारे फायदेसुद्धा होतात. जाणून घ्या याबद्दल.

चांगली झोप येण्यास मदत

दरम्यान, गवतावर अनवाणी चालल्यामुळे आपल्या झोपेची गुणवत्ता सुधारते. तसेच आपण पृथ्वीच्या इलेक्ट्रॉन्सच्या संपर्कात आल्यामुळे सर्केडियन लय नियमित होण्यास आणि झोपेच्या पद्धती सुधारण्यास मदत होऊ शकते.

मूड चांगला होतो

गवंतावरती चालल्यामुळे आपल्या शरीरातील मूड लाफ्टर असणारे एंडोर्फिन हे ऍक्टिव्ह होते. ज्यामुळे आपला मड नैसर्गिकरित्या आपोआप चांगला होतो. याचबरोबर गवंतावरती चालल्यानंतर बर्याच लोकांना अधिक आनंद आणि आरामसुद्धा वाटतो.

तणाव दूर करण्यासाठी उपयुक्त

सध्या आपल्या दगदगीच्या जीवनशैलीमुळे आपण अनेक तणावांना सामोरे जात असतो. मात्र गवतावर चालल्याने तुमचे मन शांत होते, ज्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. निसर्गामध्ये रमल्यास आपला टॅन आपोआप कमी होण्यास मदत होते. आणि यामुळे आपले मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत सुद्धा होते.

दरम्यान, नियमित गवतावर अनवाणी चालल्यामुळे आपल्या शरीरातील एखादे जुने दुखणे असेल तर त्याच्या वेदना कमी होतात. यामुळे तुम्हाला जर तुम्हाला कोणत्या आजारामुळे सूज येत असेल तर तीही बारी होण्यास मदत करते. याचबरोबर आपल्या मनात कोणत्या गोष्टीसाठी अस्वस्थता असेल तर गवतावर चालल्यामुळे आपली अस्वस्थता आपोआप कमी होते.

जळजळ कमी होते

गवतावरती अनवाणी चालल्यामुळे आपला व्यायाम तर होतोच पण याचसोबत एका अभ्यासात असे दिसून आले आहे की जर आपण गवतावरती दोन तास विना चप्पल चाललो तर आपल्याला होणारी जळजळ ही कमी होते. तसेच यामुळे आपल्याला हृदयविकार, आणि टाइप 2 मधुमेह यासारख्या गंभीर आजारांचा होणार धोका कमी होतो. यामुळे गवतावर अनवाणी चालणे हे आपल्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

दरम्यान, फक्त गवंतावरती चालणेच नव्हे तर निसर्गाशी कोणत्याही प्रकारे आपण जोडलो गेलो कि आपल्या रोजच्या तणावापासून मुक्तता मिळते. आणि आत्मसमाधान सुद्धा लाभते. यामुळे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा निसर्गाशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न नक्की करा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe