अहमदनगर मधील ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा

Published on -

Ahmednagar News : अहमदनगर शहरात बेकायदेशीर रित्या प्रवेश करणाऱ्या जड वाहतुकीमुळे १७ वर्षीय शालेय विद्यार्थी अनस शेख या विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाला. शहरामध्ये जड वाहतुकीला बंदी असताना देखील सरोसपणे वावरणाऱ्या जड वाहतुकीच्या प्रवेशाला जबाबदार कोण? आता हाच प्रश्न उपस्थित झाला आहे.

गेल्या अनेक वर्षापासून शहरांमध्ये होत असलेल्या अपघातात आणि त्या अपघातात मृत्युमुखी पडण्याची संख्या वाढत असल्यामुळे शहरांमध्ये जड वाहतुकीस बंदी घालण्यात आली होती.

मात्र असे असताना देखील महामार्ग पोलीस व वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षेमुळे जड वाहतूक सरोसपणे शहरांमध्ये प्रवेश करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अपघात झाला त्यावेळी ड्युटीला जे पोलीस कर्मचारी नेमणुकीला होते.

त्यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी विश्व मानवाधिकार परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नवेद शेख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी अल्पसंख्यांक जिल्हा अल्ताफ शेख, जिल्हा अध्यक्ष अज्जू शेख, साहेबान जहागीरदार, हाजी वहाब सय्यद, जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख, सरफराज खान, कैफ शेख, रमिज शेख, शरीफ सय्यद, अरुण कोंडके आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe