Car Buying Tips : दिवाळी काही दिवसांमध्येच सुरु होणार असून, दिवाळीच्या मुहूर्तावर अनेकद खरेदी केली जाते. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अनेकदा नवीन कार घेतली जाते. जर तुम्ही सुद्धा दिवाळीमध्ये नवीन कार घरी आणण्याचा विचार करत असला तर या टिप्स लक्षात ठेवा ज्यामुळे तुम्हाला तोटा होणार नाही.
दरम्यान, कार खरेदी करताना अनेक गोष्टींचे योग्य नियोजन करावे लागते. ज्यामुळे तुम्हाला नंतर कोणताही त्रास होणार नाही. आल्या बजेट सोबत कार संबंधित इतर अनेक गोष्टीची शाहनिशा करूनच कार खरेदी करावी.

नवीन कार खरेदी करण्यापूर्वी, आपल्या बजेटची योग्य सोय करा. जर कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर त्याबद्दल ही योग्य प्लांनिंग करा. तसेच तुम्हाला डाऊन पेमेंट करायचे आहे तर त्याचा पूर्ण हिशोब ठेवा. आपल्या बजेटचे पूर्ण प्लॅनिंग केल्यानंतरच गाडी घेण्याचा निर्णय पक्का करा.
दरम्यान, बजेट ठरवल्यानंतर, तुम्ही तुमच्या बजेटच्या किमतीच्या इतर गाड्यांची चौकशी करा. त्या किमतीच्या इतर कोणत्या गाड्या बाजरातमध्ये आहेत याचीही चौकशी करा. आणि त्यामध्ये सर्वात चांगली गाडी कोणती हे पाहून नवीन गाडी घेणे ठरवा.तसेच इतर गाड्यांशीही त्याची तुलना करावी.
जेव्हा तुम्ही कार खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा तिथे तुम्हाला विविध कार पाहायला मिळतील. यानंतर तुम्ही तुमच्या आवडीच्या कारची निवड करावी.
याचबरोबर कार खरेदी करण्यापूर्वी, तुम्ही गाडीची टेस्ट ड्राइव्ह घेणे अत्यंत आवश्यक आहे. टेस्ट ड्राईव्हमुळे तुम्हाला तुमच्या गाडीचा परफॉर्मन्स लक्षात येतो. यासोबतच गाडीबद्दल काही शंका असल्यास आपण ती दूर सुद्धा करू शकतो.