Shrigonda News : कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पा. कुकडी सह. साखर कारखाना चालू गाळप हंगामात २६०० रुपयांचा भाव देणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आमदार आ. राहुल जगताप यांनी जाहीर करत कामगार व सभासदांची दिवाळी गोड करणार असल्याची माहिती दिली.
कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पा. कुकडी सह. साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ आणि गव्हाण पूजन कार्यक्रम रविवार, दि. ५ रोजी पार पडला.. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
या वेळी रमाता पत्नी सोनाली शिंदे, हसिना शेख, रंजना काळे, शालन कांबळे, नर्मदा गिरमकर, मोहिनी म्हस्के, सुमन वीर, पुष्पा गुंड, शोभा घुटे, सिताबाई तळेकर यांच्या हस्ते २० व्या गाळप हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. तर बॉयलर अग्निप्रदिपन प्रियंका जगताप, रेखा शिंदे, कमल निंभोरे, पुष्पा घाडगे सुरेखा इथापे, मंगल पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
साखर कारखानदारीत ऊस आणि भावाची स्पर्धा वाढत आहे, कर्मयोगी कुंडलिकराव जगताप कुकड़ी सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम केले. गेल्या गाळप हंगामातील उसाला २६११ रुपयांचा भाव दिला आहे.
काहींना स्वतःपेक्षा कुकडी साखर कारखान्याची चिंता लागली आहे. मात्र, त्यांनी चिंता करु नये, कुकडी हा सर्व बाजूंनी सक्षम आहे. आडचणीच्या काळात सहकारी साखर कारखाने शेतकऱ्यांच्या मागे उभं राहतात. प्रास्ताविक कार्यकारी संचालक एस वाय महिंद्र यांनी केले.
या वेळी उपाध्यक्ष विवेक पवार, डॉ. प्रणोती जगताप जालिंदर निंभोरे, संभाजी देवीकर, बाळासाहेब उगले, विमल मांडगे, नारायण पाटील, पोपटराव ढगे उपस्थित होते. सूत्रसंचलन मोहनराव आढाव यांनी केले. आभार विष्णू जठार यांनी मानले