TVS च्या ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरने घातलाय धुमाकूळ ! रेंज, किंमत व फीचर्स पाहून थक्क व्हाल

Ahmednagarlive24 office
Published:
TVS Electric Scooter

TVS Electric Scooter : सध्याचा जमाना इलेक्ट्रिक वाहनांचा आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे आजच्या काळात प्रत्येकजण इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यावर भर देत आहे. भविष्यात पेट्रोल आणि डिझेलची वाहने बंद होऊ शकतात हे

आता लोकांनाही समजू लागले आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रिक वाहनांची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांच्या आर्थिक स्थितीवर त्याचा फारसा परिणाम होत नाही. कारण दररोज पेट्रोलवर होणार बेफाम खर्च वाचत असल्याने लोक आता इलेक्ट्रिक वाहनांच्या मागे धावत आहेत.

भारतात अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहने लाँच केली आहेत, पण आजकाल टीव्हीएसची इलेक्ट्रिक स्कूटर लोकांमध्ये अधिक लोकप्रिय होत आहे. त्या स्कूटरचे अनेक खास फीचर्स आहेत, ज्यामुळे लोक ती मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. याठिकाणी आपण या TVS च्या iQube Electric स्कूटरबद्दल सर्व काही माहिती पाहणार आहोत.

TVS iQube

टीव्हीएसची आयक्यूब इलेक्ट्रिक स्कूटर सध्या खूप लोकप्रिय होत आहे, त्यामुळे अनेक जण ती खरेदी करत आहेत. स्कूटरमध्ये जबरदस्त रेंज, स्पीड आणि फीचर्स देण्यात आले आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटरच्या लाँचिंगनंतर कंपनीने सर्वाधिक विक्री केली आहे, त्यामुळे आता याची रेंज, स्पीड, किंमत आणि फीचर्सबद्दल जाणून घेऊया.

TVS iQube ची रेंज व स्पीड

टीव्हीएसने या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 4.56 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक वापरला आहे, जेणेकरून एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 140 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकेल. स्कूटरची बॅटरी फुल चार्ज होण्यासाठी 5 तास लागतात. तर याची टॉप स्पीड 78 किमी प्रति तास आहे.

TVS iQube चे फीचर्स

कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये डिजिटल ओडोमीटर, Regenerative breaking, OTA Updates, Call/SMS Alerts, Anti theft system, Geo fencing, Low Battery Indicator, Clock Mobile App Connectivit, USB charging port आदींसारखे अनेक उत्तम फीचर्स दिले आहेत.

TVS iQube ची किंमत

या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1,37,890 रुपये आहे. ही किंमत दिल्लीमधील आहे, त्यामुळे इतर राज्यांमध्ये ती वेगवेगळी असू शकते. आजकाल टीव्हीएस आयक्यूब इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री वेगाने होत आहे. गेल्या महिन्यात कंपनीने या स्कूटरचे 1.40 लाखांहून अधिक युनिट्स विकले आहेत. यावरून तुम्ही कल्पना करू शकता की ही स्कूटर किती लोकप्रिय आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe