RBI News : जगातील आर्थिक घडामोडींबाबत सध्या कुठूनही चांगली आशादायक बातमी येत नाहीये. युरोपपासून मध्यपूर्वेपर्यंत तणाव आहे. त्यामुळे दरम्यान, कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. हमास आणि इस्रायलयांच्यात युद्ध सुरू आहे,
जे सध्या तरी थांबताना दिसत नाही. त्यामुळे आर्थिक बाबतीत एक प्रकारचा तणाव निर्माण झाला आहे. याचाच परिणाम म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) मोठे निर्णय घेऊ शकते, यामुळे देशातील नागरिकांसाठी मोठे धक्के बसू शकतात.

रिझर्व्ह बँक नेमके काय निर्णय घेऊ शकते किंवा त्याचा काय परिणाम होवू शकतो हे आपण येथे जाणून घेऊयात –
* 0.25 बेसिस पॉईंटची वाढ होऊ शकते
आरबीआयने आतापर्यन्त रेपो दरात चार वेळा कोणताही बदल केलेला नाही. असे असले तरी आता आरबीआय रेपो दरात वाढ करू शकते, असे दिसत आहे. फेडरल बँक ऑफ अमेरिकेनेही आपल्या रेटमध्ये बदल केलेला नाही.
परिणामी रुपयावरील प्रेशर वाढतच चालला आहे. त्यामुळे 0.25 बेसिस पॉईंट्सची वाढ आगामी वर्षात पाहायला मिळू शकते असा अंदाज आहे.
ग्राहकांच्या खिशावर पडेल ताण
रेपो दरात वाढ झाल्याने महागाई वाढते. तसेच सर्व ईएमआय महाग होऊन जातात. त्यामुळे घरापासून तर गाडी घेण्यापर्यंत सर्व गोष्टी अवघड होऊन बसतात. रिझर्व्ह बँकेची पुढील बैठक नोव्हेंबरमध्ये होणार असून पुढील महिन्यात डिसेंबरमध्ये रेपो दर जाहीर करण्यात येणार आहे. म्हणजेच नव्या वर्षात ग्राहकांना नक्कीच धक्का बसेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
रुपयाची घसरण सुरूच
डॉलरच्या तुलनेत रुपया ची घसरण सुरूच आहे. आज डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन 83.26 वर गेले आहे. त्यामुळे हे थांबवले नाही तर देशात मंदीचे सावट निर्माण होण्याची चिन्हे आहेत. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात बदल केला की रुपया सुधारतो. त्यामुळे आता यावर देखील निर्णय होऊ शकतो असे म्हटले जात आहे.
जागतिक घडामोडींचाही परिणाम
जागतिक स्तरावर मोठ्या घडामोडी घडतात. त्याचा परिणाम आर्थिक जगतावर होतो. परिणामी आर्थिक मंदी किंवा इतर गोष्टी निर्माण होतात. या सर्व गोष्टी पाहता आता आरबीआय यावर वेगळा निर्णय घेऊ शकते असे म्हटले जात आहे.