श्रीरामपूरातील १७ पैकी १० सरपंच भाजप व युतीचे

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष दिपक पटारे व सहकाऱ्यांनी चांगले नियोजन करत ग्रामपंचायत निवडणुकीत १७ ग्रामपंचायती पैकी १० सरपंच भाजप व युतीचे विजयी झाले.

यामध्ये रामपूर व जाफराबाद बिनविरोध, शिरसगाव, कडित, नाऊर, कान्हेगाव, फत्याबाद संपूर्ण भाजपसह विखे गटाचे तर युतीचे भोकर, निमगाव खैरी, उंदीरगाव युतीमध्ये विजयी ग्रामपंचायतींचे सरपंच विजयी करत भाजपचा झेंडा रोवला आहे.

श्रीरामपूर तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या बालेकिल्ल्यात प्रथमच भाजपने आपला विजयी झेंडा रोवला आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष दिपक पटारे, नितीन दिनकर, नानासाहेब पवार, शरद नवले, नानासाहेब शिंदे, गणेश मुदगुले, इंद्रभान थोरात, गिरीधर आसने,

भाऊसाहेब बांद्रे, संदीप शेलार, नितीन भागडे, रामभाऊ लिपटे, केतन खोरे, अभिषेक खंडागळे, महेश खरात, पांडुरंग आठरे, भाऊसाहेब वडीतके, प्रताप देसाई यांसह प्रमुख कार्यकर्त्यांनी या गावांमध्ये नियोजनबध्द काम केले. भाजपने पहिल्यांदाच गाव पातळीवर निवडणुकीत सहभाग घेऊन विजय मिळविला.

रामपूर व जाफराबाद यापूर्वीच बिनविरोध भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. तर शिरसगाव, कडित, नाऊर, कान्हेगाव, फत्याबाद येथे संपूर्ण भाजपचे सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले. तर युतीचे भोकर, निमगाव खैरी, उंदीरगामध्ये भाजप व स्थानिक युतीचे सरपंचपदाचे उमेदवार विजयी झाले. विजयी उमेदवारांचे तालुकाध्यक्ष दिपक पटारे व प्रमुख नेत्यांनी विखे पाटील यांच्या बेलापूर रोड येथील जनसंपर्क कार्यालयात सत्कार केला.

यावेळी पटारे म्हणाले की, ग्रामीण भागात निधी कमी पडू दिला जाणार नाही. नामदार विखे पाटील यांच्यावर जनतेने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्याचे काम आपण सर्वांचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी सुनील वाणी, डॉ. शंकरराव मुठे, विठ्ठलराव राऊत, मारुती बिंगले, सतीश सौदागर, महेंद्र पटारे,

दत्ता जाधव, असिफ पटेल, मंजुश्री ढोकचौळे, संचित गिरमे, अनिल थोरात, पूजा चव्हाण, बाबासाहेब साळवे, बाबासाहेब चिडे, रामभाऊ जगताप, रामभाऊ तरस, बाळासाहेब हरदास, गणेश राठी, जितेंद्र छाजेड, रवी पाटील, दिपक चव्हाण, कान्हा खंडागळे, दिलीप त्रिभुवन, अनिल भनगडे, भीमा बागुल, प्रवीण लीपटे, मुकुंद हापसे, लक्ष्मण भवर, नानासाहेब तनपुरे, अनिल चीतळकर, दिपक बारहाते आदींनी सत्कार केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe