आनंदाची बातमी ! Nokia आणि Jio येणार एकत्र आणि लॉन्च करणार जगातला सर्वात स्वस्त मोबाईल

Published on -

JIO नेहमीच आपल्या ग्राहकांची काळजी घेत असते. 2016 पासून तर आजतागायत कंपनीने आपल्या उत्कृष्ट सेवेने आपल्या युजर्सच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे.

आता पुन्हा एकदा कंपनीने जबरदस्त प्लॅनिंग केले आहे. आता JIO ही नोकियाच्या मदतीने देशातील सर्वात स्वस्त मोबाइल फोन लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही कंपन्यांमधील चर्चा अंतिम टप्प्यात आहे.

25 करोड युजर्सवर कंपनीची नजर :-दोन्ही कंपन्या मिळून एका महिन्यात JIO Bharat Phone चे अनेक व्हेरियंट बाजारात आणू शकते अशी माहिती आहे. एका न्यूजनुसार, जिओने म्हटले आहे की,

आम्ही देशातील सुमारे 25 करोड युजर्सर्त्यांसाठी स्वतंत्र प्लॅनवर काम करत आहोत. सर्व युजर्सकडे सर्वात स्वस्त पण सर्वोत्तम फोन असावा अशी आमची इच्छा आहे. आम्ही नोकिया सह लावा सारख्या कंपन्यांच्या संपर्कात आहोत.

दोन्ही कंपन्या JIO Bharat Phone च्या ऍडव्हान्स व्हर्जनसाठी एकत्र काम करणार :-सध्या जिओ भारत फोन हा 3 व्हेरियंटमध्ये बाजारात उपलब्ध आहे. याची किंमत 999 ते 1,299 रुपयांदरम्यान आहे.

जिओ भारत फोन इतर फीचर फोनच्या तुलनेत एडवांस आहे. पण मागणी लक्षात घेता कंपनीने उत्पादनासाठी वेगळ्या योजनेवर काम करण्याची गरज आहे. फोनमध्ये यूपीआयसोबतच जिओसिनेमा, जिओ सावन सारखे चांगले अॅप्सही वापरू शकता.

जानेवारी 2024 मध्ये लाँच होण्याची शक्यता :-कंपनीला या फोनमध्ये 4G तंत्रज्ञानाचा वापर करायचा आहे. असे झाल्यास जिओ भारत फोन देशातील सर्वात स्वस्त 4G फोन बनेल.

लाँचिंगबद्दल बोलायचे झाले तर हा फोन जानेवारी 2024 मध्ये बाजारात येऊ शकतो. कमी किमतीमध्ये फोन जर अव्हेलेबल झाला तर नक्कीच याची डिमांड वाढेल यात शंका नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News