Intermittent Fasting Benefits : उपवास हा आपल्या शरीरासाठी उत्तम असतो. उपवास केल्याने आपल्या आरोग्यास फायदे होतात. मात्र उपवासामुळे एका गंभीर आजाराचा धोका टळतो. मधुमेह हा आजार सध्या अनेकांनमध्ये पाहायला मिळतो. मात्र जर तुम्ही उपवास करत असाल तर यामुळे मधुमेहाचा टाईप 2 हा एक गंभीर आजार होण्यापासून रोखला जाऊ शकतो.
दरम्यान, एक अभ्यासामध्ये हे समोर आले असून, एका ठराविक वेळी नियोजित जेवण केल्यामुळे आपल्याला होणार टाईप २ हा मधुमेहाचा आजार रोखला जाऊ शकतो, जाणून घ्या सविस्तर.
टाइप 2 मधुमेह हा एक गंभीर आजार असून, यामध्ये या रुग्णास आपले वजन कमी करण्यास अनेक अथडळे येतात. मात्र नुकत्याच समोर आलेल्या एका अभ्यासात असे स्पष्ट झाले आहे की आल्या जिवांचे योग्य नियोजन केल्यास आणि योग्य वेळी आहार घेतल्या मधुमेह असलेल्या लोकांचे वजन कमी करण्यास मदत तर होतेच पण या आजराचा धोकासुद्धा टाळू शकतो.
संशोधकांच्या मते, टाईप 2 मधुमेह असलेल्या लोकांनी सकस आहार घेणे अत्यंत उपयुक्त ठरू शकते. दरम्यान, यामुळे तुम्हाला कॅलरीजचे प्रमाण कमी करण्याची गरज नाही. त्याऐवजी, तुम्ही दिवसाच्या 8 तासांच्या आत खावे आणि उर्वरित 16 तास उपवास करावे. यामुळे शरीरातील कॅलरीजचे प्रमाण नियंत्रित राहते आणि वजन सहज कमी होते.
दरम्यान, १६ तास आपण काही आहार घेतलाच नाही तर आपल्या शरीरातील कॅलरीज मोठ्या प्रमाणात बर्न होतात. दरम्यान, हा देखील अधूनमधून उपवास करण्याचा नियम आहे. हा नियम जर आपण पळाला तर आपल्यासाठी हा अत्यंत फायदेशीर ठरतो.
दरम्यान, मधुमेह असणाऱ्या व्यक्तीने नियमित व्यायाम करावा. यामुळे आपल्या शरीरातील वजन कमी होण्यास आणि इन्सुलिनची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. तसेच या व्यक्तीने सकस आहार घेणे फायद्याचे ठरते.
निरोगी आहारामध्ये फायबर, प्रथिने आणि निरोगी चरबी जास्त प्रमाणात असणे आवश्यक आहे. याचसोबत आपल्या खाण्याच्या वेळा निश्चित करा. ठरलेल्या वेळी खा. नियोजित वेळेत जेवण केल्याने भूक नियंत्रित ठेवता येते, चयापचय वाढतो आणि इन्सुलिनची पातळी नियंत्रित होते.