Jio AirFiber : विना केबल मिळवा हाय स्पीड 5G इंटरनेट, जाणून घ्या जिओ एअर फायबरबद्दल..

Ahmednagarlive24 office
Published:

Jio AirFiber : देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने या वर्षी सप्टेंबरमध्ये आपली वायरलेस इंटरनेट सेवा Jio AirFiber लाँच केली आहे. दरम्यान, लाखो वापरकर्ते त्याची सेवा घेत आहेत.  दरम्यान, यामुळे WiFi सह 5G इंटरनेट गतीचा लाभ मिळेल. यासोबतच1.5Gbps पर्यंत स्पीडसुद्धा मिळू शकते. जाणून घ्या या सेवेबद्दल.

दरम्यान, ही सेवा AirFiber पेक्षा वेगळी आहे कारण तिचे कनेक्शन मिळवण्यासाठी केबल नेटवर्क आवश्यक आहे. तर याउलट Jio AirFiber वायरलेस पॉइंट-टू-पॉइंट रेडिओ लिंक्स आणि केबलशिवाय थेट वायरलेस कनेक्शनसह WiFi वर 5G स्पीड देते. तर Jio AirFiber सह, वापरकर्त्यांना चांगले इंटरनेट आणि 1.5Gbps पर्यंतचा स्पीड सुद्धा मिळतो.

दरम्यान, JioFiber सह, वापरकर्त्यांना 1Gbps पर्यंत कमाल गतीचा लाभ दिला जात आहे. दोन्ही सेवा निवडक योजनांसह OTT सेवांचा लाभ देतात. मात्र, एअरफायबरचे फायदे सध्या केवळ निवडक शहरांमध्येच उपलब्ध आहेत. ज्या भागात केबल नेटवर्क पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी एअरफायबरसह हाय-स्पीड इंटरनेट पुरवण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

जिओची ही नवीन इंटरनेट सेवा सध्या अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, मुंबई आणि पुणे या शहरामध्ये उपलब्ध आहे.

Jio AirFiber लाँच करून, कंपनीने वेगवान इंटरनेट स्पीड आणि अतिरिक्त फायद्यांसह 6 AirFiber योजना देखील सादर केली आहे. दरम्यान, या कंपनीने Airfiber आणि AirFiber Max या दोन श्रेणी मध्ये वर्गीकरण केले आहे.

Jio AirFiber या श्रेणीमध्ये, Jio ने 599 रुपये, 899 रुपये आणि 1199 रुपये किंमतीचे तीन प्लॅन आणले आहेत. तर या प्लॅनमध्ये 100 Mbps पर्यंतचा हाय-स्पीड इंटरनेट डेटा, तसेच 550 हून अधिक डिजिटल चॅनेल आणि 14 OTT अॅप्समध्ये प्रवेश यासारखे अनेक सुविधा याद्वारे देण्यात आल्या आहेत. दरम्यान, 1199 रुपयांच्या प्लॅनमध्ये Netflix, Amazon Prime आणि JioCinema Premium चे मोफत सबस्क्रिप्शन देखील दिले गेले आहे.

जिओ एअरफायबर मॅक्स प्लॅन या प्लॅनमध्ये, जिओने 1499 रुपये, 2499 रुपये आणि 3999 रुपये किंमतीचे तीन प्लॅन ऑफर केले आहेत. हे प्लॅन 1 GBPS पर्यंत इंटरनेट डेटा गती आणि 550 हून अधिक डिजिटल चॅनेल आणि Netflix, Amazon Prime आणि JioCinema Premium सारख्या 14 OTT अॅप्समध्ये प्रवेशासह अनेक अतिरिक्त फायदे देतात. JioAirFiber Max हा काही ठराविक भागांमध्ये उपलब्ध आहे.

दरम्यान, Jio AirFiber सेवेची किंमत 6,000 रुपये आहे. हे नियमित ब्रॉडबँडपेक्षा थोडे अधिक महाग आहे कारण ते एक पोर्टेबल डिव्हाइस आहे. तर त्याची किंमत 7,733 रुपये आहे.

दरम्यान, जिओचे कॅनेकशन घेण्यासाठी सर्व प्रथम, जिओच्या वेबसाइटवर जा आणि जिओ एअरफायबर सेवा तुमच्या क्षेत्रात उपलब्ध आहे की नाही ते तपासा. यानंतर तुम्हाला बुकिंग करावे लागेल. तुम्ही जवळच्या Jio स्टोअरला भेट देऊन, Jio वेबसाइट किंवा MyJio अॅपच्या मदतीने किंवा 60008-60008 वर मिस कॉल देऊन आपले बुकिंग करू शकता. तर यासाठी तुम्हाला आवश्यक माहिती देऊन Jio AirFiber साठी नोंदणी करावी लागेल. यानंतर निर्धारित वेळेनंतर, तुम्हाला कंपनीकडून कन्फर्मेशन मिळेल आणि इंस्टॉलेशनचे काम केव्हा पूर्ण होईल हे सांगितले जाईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe