BSNL 5G : BSNL सुरु करतय 5G सेवा, एअरटेल जिओला टक्कर, जाणून घ्या..

Ahmednagarlive24 office
Published:

BSNL 5G : BSNL च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी असून, BSNL ने आपली 4G सर्व्हिस सुरु केली असून, लवकरच ग्राहकांना ती मिळणार आहे. तर यंत्र लवकरच ते ग्राहकांना 5G सेवा देण्याच्या तयारीमध्ये आहेत. दरम्यान, पुढील वर्षापर्यंत ही सेवा सुरु होईल अशी माहिती देखील कंपनीकडून मिळाली आहे.

गेल्या वर्षी देशात 5G सेवा सुरू झाली. खाजगी दूरसंचार कंपन्यांनी त्यांच्या 5G नेटवर्कची व्याप्ती झपाट्याने वाढवली आहे. बीएसएनएलला खासगी टेलिकॉम कंपन्यांकडून कठीण स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. मात्र लवकरच कंपनी नव्याने सुरुवात करून देशात 5G सेवा सुरु करण्यावर भर देणार आहे.

बीएसएनएलचे अध्यक्ष पीके पुरवार यांनी ही कंपनी डिसेंबरमध्ये 4G सेवा सुरू करेल आणि जूनपर्यंत या सेवा संपूर्ण देशात विस्तारित करेल अशी माहिती दिली होती. दरम्यान, यानंतर कंपनीचे 5G नेटवर्क अपग्रेड कारण्यावरती भर दिला जाईल अशीही माहिती त्यांनी दिली आहे.

दरम्यान, BSNL कडून ग्राहकांना मोफत 4G सिम अपग्रेड दिले जाणार आहे. दरम्यान, कंपनीच्या आंध्र प्रदेश युनिटने X वर एक पोस्ट शेअर केली आहे. याद्वारे त्यांनी BSNL च्या यूजर्सना त्यांचे जुने 2G किंवा 3G सिम विनामूल्य 4G वर अपग्रेड करता येणार आहे. सोबतच या पोस्टसोबत शेअर केलेल्या इमेजमध्ये तीन महिन्यांसाठी मोफत 4G डेटाही दिला जाणार आहे. मात्र यासाठी कंपनीच्या वापरकर्त्यांना बीएसएनएलच्या ग्राहक सेवा केंद्र, फ्रँचायझी किंवा रिटेलर स्टोअरला भेट द्यावी लागेल.

कंपनीने आपली 4G सेवा वाढवण्याच्या उद्देशाने ही ऑफर आणली आहे. कंपनीची ही मोफत ऑफर वापरकर्त्यांना 3G वरून 4G वर अपग्रेड करण्यास प्रवृत्त करेल अशी अशा व्यक्त करण्यात अली आहे. दरम्यान, 4G नंतर BSNL लगेच 5G सेवा सुरु करण्याच्या तयारीमध्ये आहे. दरम्यान,आगामी काळात BSNL हे इतर टेलिकॉम कंपन्यांसाठी स्पर्धा ठरू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe