सध्या तरुणाई बिझनेस करण्याच्या मागे लागली आहे. अनेकांना नवनवीन बिझनेस करायचे असतात. तर अनेक तरुणांना कुठेतरी स्टार्टअपची सुरुवात करायची असते. परंतु व्यवसाय काय करावा याची कल्पना अनेकांना नसते. यासाठी ही बातमी तुम्हाला फायदेशीर ठरेल.
तुम्ही टिश्यू पेपर बनवण्याचा व्यवसाय सुरु करू शकता. कमी गुंतवणुकीत हा फायदेशीर व्यवसाय आहे. ढाबा, ऑफिस, रेस्टोरेंट, हॉटेल आदी ठिकाणी याचा सर्रास वापर केला जातो. विशेश म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारही मदत करत आहे. याबद्दल जाणून घेऊयात –

साडेतीन लाखांत सुरु होईल व्यवसाय :- साडेतीन लाख रुपयांत टिश्यू पेपर बनवण्याचा व्यवसाय सुरु करू शकता. यासाठी कोणत्याही बँकेकडून मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेऊ शकता. त्यामुळे तुमचा व्यवसाय जोरात सुरु होईल.
भरपूर कमाई होईल :-वर्षभरात तुम्ही या युनिटद्वारे 1 लाख 50 हजार किलो पेपर नॅपकिन्स तयार करू शकतात. तुम्ही ते सुमारे 65 रुपये प्रति किलो दराने विकू शकता, म्हणजे तुम्ही एका वर्षात सुमारे 97 लाख 50 हजार रुपयांची उलाढाल करू शकता. यातून खर्च वजा करता सुमारे 10 लाख ते 12 लाख रुपये नफा कमाऊ शकता. तुम्ही तुमचे नॅपकिन्स विकण्यासाठी मल्टीनेशनल कंपनीशी करार देखील करू शकता. यातून तुम्हाला लाखोंचा नफाच होईल.
मुद्रा लोन :- प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही बँकेत अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल, ज्यामध्ये नाव, पत्ता, शिक्षण, व्यवसाय पत्ता, कर्ज आवश्यकता आदी माहिती भरावी लागलं. यात कोणत्याही प्रकारचे प्रोसेसिंग फी किंवा गॅरंटी फी भरावी लागणार नाही.
मेहनतीने खूप पैसे कमवाल :-तुम्ही जर मेहनत घेतली, कष्ट केलं तर तुम्ही नक्कीच भरपूर पैसे कमावू शकता. तुम्ही या व्यवसायात लाखो रुपयांची इन्कम करू शकता. प्रामाणिकपणा, सचोटी ठेवली तर कोणताही बिझनेस यशस्वी होतोच.