Sun Transit : सूर्याच्या चालबदलाने होणार उलथापालथ, ‘या’ 5 राशींना होईल नुकसान !

Content Team
Updated:
Sun Transit

Sun Transit : ज्योतिष शास्त्रात सूर्याला खूप महत्व आहे. अशातच जेव्हा सूर्याची हालचाल होते तेव्हा त्याचा परिणाम मानवी जिवनात दिसून येतो. अशातच काल 12 नोव्हेंबर रोजी सूर्याने वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. ज्यामुळे काही राशीच्या लोकांनी खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सूर्याला प्रगती, आदर, तेज आणि कार्यशैलीची देवता मानले जाते.

ज्योतिष शास्त्रानुसार सूर्याच्या राशीत होणारा बदल खूप महत्वाचा मानला जातो. अशातच सूर्याच्या या राशी बदलाचा काही राशींवर अशुभ परिणाम दिसून येईल. १७ नोव्हेंबरला सूर्य आपली राशी पुन्हा बदलेल. यामुळे सर्व राशींवर काही नकारात्मक प्रभाव दिसतील. कोणत्या राशींवर परिणाम दिसून येतील चला पाहूया….

मेष

सूर्य वृश्चिक राशीत असल्याने मेष राशीच्या लोकांच्या मनात आशा-निराशेच्या भावना निर्माण होतील. तसेच कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. ज्यामुळे तणाव वाढू शकतो. संभाषणात संयम राखणे आवश्यक आहे. अन्यथा कामे बिघडू शकतात. उत्पन्नाची स्थिती चांगली राहील. शैक्षणिक कामात अडचण येण्याची शक्यता आहे.

वृषभ

या राशीच्या लोकांनी आरोग्याबाबत जागरुक राहावे लागेल. राहणीमानात बदल होऊ शकतो. कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. अज्ञात भीतीने त्रस्त राहाल. भावांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. काळजी घ्या.

सिंह

आत्मविश्वासाची कमतरता असेल, या काळात संयम राखणे आवश्यक आहे. राग टाळावा अन्यथा नुकसान होऊ शकते. तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेत लाभ मिळेल पण त्यासाठी तुम्हाला धावपळ करावी लागू शकते. प्रवासात जखमी होण्याची शक्यता आहे. अतिउत्साही होणे टाळावे लागेल.

मकर

मकर राशीत जास्त आळशीपणा दिसून येईल. व्यवसायात प्रगती होईल पण त्यात अडचणी येऊ शकतात. आयुष्य धकाधकीने भरलेले असेल. वाहन आरामात काही अडचण येऊ शकते. शैक्षणिक कार्यात व्यत्यय येऊ शकतो. अतिरिक्त जबाबदारीमुळे तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

मीन

अति रागामुळे मीन राशीचे लोक त्यांच्या अनेक कामात अयशस्वी होऊ शकतात. स्वत:ला सहमत ठेवणे आवश्यक असेल. नोकरीत प्रगतीसाठी धावपळ करावी लागू शकते. आपल्या खाण्याच्या सवयींबद्दल जागरूक रहा. पोटाशी संबंधित आजारांना सामोरे जावे लागू शकते. तुम्हाला व्यवहार टाळावे लागतील अन्यथा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांना संयमी राहावे लागेल. राग टाळला पाहिजे. अन्यथा कामे बिघडू शकतात. संभाषणात संतुलन राखणे आवश्यक आहे. नोकरीत प्रगतीसाठी धावपळ करावी लागेल. उत्साहामुळे अनेक गोष्टी बिघडू शकतात. परदेश प्रवासाची शक्यता आहे. मात्र, त्यासाठीचा खर्च वाढणार आहे. विचारपूर्वक पुढची पावले उचला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe