Petrol Diesel Price : दिवाळीनंतर महागाईचा भडका, पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ, जाणून घ्या..

Ahmednagarlive24 office
Published:

Petrol Diesel Price : दिवाळीच्या सुट्टीनंतरचा आज पहिला कामाचा दिवस आहे. जर आज तुम्ही तुमच्या वाहनात पेट्रोल किंवा डिझेल भरण्याचा विचार करत असाल तर त्याआधी आजच्या तेलाच्या ताज्या किमती माहीती असणे आवश्यक आहे. कारण आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. जाणून घ्या आजच्या तेलाच्या ताज्या किमती.

तेल कंपन्यांनी मे 2022 पासून राष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमती स्थिर ठेवल्या असल्या, तरी काही शहरांमध्ये किमतीत सुधारणा करताना काही पैशांचा बदल नक्कीच दिसून येतो. जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीनतम दर.

शहर पेट्रोल (किंमत प्रति लिटर) डिझेल (किंमत प्रति लिटर)

आज नोएडा येथे पेट्रोल रु. 96.76 लिटर असून डिझेलचा दर हा रु. 89.93 इतका आहे. तर गुरुग्राम येथे रु. 96.97 इतका पेट्रोलचा दार असून, डिझेल हे रु. 89.84 इतके लिटर आहे.

दरम्यान, पाटणा येथे आज रु. 107.54 पेट्रोलचा दार असून, डिझेल हे रु. 94.32 इतके असेल. यानंतर चेन्नई येथे पेट्रोलचा दर रु. 102.74 इतका आहे. तर डिझेलचा दर हा रु. 94.33 इतका आहे.

तिरुवनंतपुरम येथे पेट्रोल रु. 109.42 इतके आहे तर डिझेलचा दर हा रु. 98.24 इतका असेल. तर भुवनेश्वर येथे पेट्रोलचा दर रु. 103.04 इतका आहे. तर रु. 94.61 इतका डिझेलचा दर असेल. दरम्यान, यासोबतच लखनौ येथे पेट्रोलचा दर रु. 96.33 इतका असणार आहे. तर डिझेलचा दर रु. 89.52 इतका आहे.

या शहरांमध्ये तेलाचे दर स्थिर राहिले

दरम्यान, नवी दिल्ली, कोलकाता, मुंबई, बेंगळुरू तसेच चंदिगढ, हैद्राबाद आणि जयपूर येथे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही आहे.

दरम्यान, कच्च्या तेलाला बॅरलमध्ये मोजले जात असून, एका बॅरलमध्ये एक लिटर कच्चे तेल नसते. तर एका बॅरलमध्ये सुमारे 159 लिटर कच्चे तेल असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe